तंबाखू मुक्त शाळा अभियानात नागोबाचीवाडी जि.प. शाळा सोलापूर जिल्ह्यात चौथी व बार्शी तालुक्यात प्रथम

सोलापूर;महाराष्ट्र स्पीड न्युज
भारत सरकारच्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाकडून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी सुधारित मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.त्या अनुषंगाने बार्शी तालुक्यातील नागोबाचीवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात सोलापूर जिल्ह्यातील चतुर्थ व बार्शी तालूका मधून प्रथम तंबाखूमुक्त शाळा ठरली आहे.
आरोग्य विभाग भारत सरकारने पारित केलेले सुधारीत नऊ निकष हे तंबाखूमुक्त आरोग्यसंपन्न मुले होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. यासाठी आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे या सुधारित नऊ निकषांना पूर्ण करण्यासाठी पत्र काढले आहे. या पत्राच्या आधारे नागोबाचीवाडी शाळेने नवीन वर्षात नऊ दिवसात नऊ निकष पूर्ण करून सोलापूर जिल्ह्यात चतुर्थ क्रमांक व तालूक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
सलाम मुंबई फाउंडेशच्या जिल्हा समन्वयक शुभांगी लाड, सारथी युथ फौंडेशनचे रामचंद्र वाघमारे, मुख्याध्यापक विवेकानंद जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील नोडल शिक्षक यांनी नवीन निकषानुसार तंबाखूमुक्त अभिमान शाळेत राबविले आहे.