तंबाखूमुक्त अभियान; जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा खांडवी (मुले)केंद्रात पहिली

बार्शी ;
तंबाखूमुक्त अभियानात जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा खांडवी (मुले)केंद्रात पहिली तंबाखू मुक्त शाळा ठरली आहे.भारत सरकारच्या सुधारीत मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण विभाग कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी सुधारीत ९ निकषाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अनुषंगाने बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळा खांडवी (मुले )२०२१-२०२३ या शैक्षणिक वर्षात तंबाखूमुक्त शाळा ठरली आहे.
आरोग्य विभागाने पारित केलेले सुधारीत नऊ निकष हे तंबाखू मुक्त व आरोग्यसंपन्न मुले होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. यासाठी आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे या सुधारीत नऊ निकषांना पत्राच्या आधारे सलाम मुंबई फाऊंडेशनच्या जिल्हा समन्वयक शुभांगी लाड, केंद्र समन्वयक तथा नागोबाचीवाडीचे मुख्याध्यापक विवेकानंद जगदाळे, देवगाव केंद्राचे केंद्रप्रमुख धनाजी जाधवर, खांडवी केंद्र केंद्रप्रमुख अरुण तिकटे यांचे मार्गदर्शन लाभले.शाळेतील नोडल शिक्षक सिंधु गिलबिले व मुख्याध्यापिका रेखावती माने व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.