तंबाखूमुक्त अभियानात देवगाव केंद्र सोलापूर जिल्ह्यात प्रथम

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज
देवगांव ता.बार्शी केंद्रातील शंभर टक्के शाळा तंबाखूमुक्त झाल्या असुन देवगाव केंद्राने सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.तंबाखूमुक्त शाळा उपक्रमातील यश्यस्वी शाळेच्या मुख्याध्यापकांचा नागोबाचीवाडी येथील जि.प.शाळेत पार पडलेल्या शिक्षण परिषदेत सन्मान करण्यात आला.
#देवगाव केंद्राच्या शिक्षण परिषदेत शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मीकांत जाधव,केंद्र प्रमुख धनाजी जाधवर, मुख्याध्यापक विवेकानंद जगदाळे,गणेश खडके आदींच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यात देवगाव केंद्र तंबाखूमुक्तीत प्रथम म्हणून घोषित करण्यात आले.
सर्व १३ शाळांना सलाम मुंबई फाऊंडेशन तर्फे सन २०२१ – २३ या कालावधी करिता डिजिटल प्रमाणपत्र देण्यात आले.
भारत सरकारच्या आरोग्य विभागाने पारित केलेले तंबाखूमुक्त शाळेचे सुधारीत ९ निकष पूर्ण करण्याकरिता नागोबाचीवाडी जि.प.शाळे चे मुख्याध्यापक तथा केंद्र समन्वयक विवेकानंद जगदाळे यांनी केंद्रातील सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करून मोलाचे परिश्रम घेतले.
##याप्रसंगी मुख्याध्यापक नागनाथ चोबे(देवगाव),रामलिंग जगदाळे (मांजरे वस्ती),सुरेश व्हळे(पांढरे वस्ती),रणदिवे(कांदलगाव),ओंकारेश्वर सालसकर (गाडेगाव),चंद्रकांत मिरगणे(खडकलगाव),महेश बर्चे (धसपिंपळगाव),दत्तात्रय पाटील (पवार वस्ती,माया कोरे(लक्ष्याचीवाडी),शारदा कोंढारे(शेलगाव,व्हळे),विवेकानंद जगदाळे(नागोबाचीवाडी) यांचा राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखूमुक्त शाळा अभियान यश्यस्वी राबवल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
सलाम मुंबई फाऊंडेशन च्या सोलापूर जिल्हा समन्वयक शुभांगी लाड यांच्या मार्गदर्शनाने केंद्रातील एकुण १३ शाळा ह्या तम्बखुमक्त शाळा घोषित करुन प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
@विलास लंगोटे,तानाजी पवार,जयश्री शेळवणे,ओंकारेश्वर सालसकर, विश्वनाथ ढाणे,अमोल मोहिते आदींनी परिश्रम घेतले.