November 29, 2022

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

तंबाखूमुक्त अभियानात जिल्हा परिषद केंद्र शाळा देवगाव

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज
भारत सरकारच्या राष्ट्रीय नियंत्रण  कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाकडून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी सुधारक मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी  करण्यात येत आहे .त्या अनुषंगाने बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र  शाळा  देवगाव  2020-21या शैक्षणिक वर्षात  बार्शी तालुक्यात द्वितीय  तंबाखूमुक्त शाळा ठरली आहे.
  आरोग्य विभाग भारत सरकारने पारित केलेले सुधारीत नऊ निकष हे तंबाखू मुक्त व आरोग्यसंपन्न मुले होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत.यासाठी आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे या सुधारीत नऊ निकषांना पत्राच्या आधारे सलाम मुंबई फाऊंडेशनच्या जिल्हा समन्वयक श्रीम. शुभांगी लाड, केंद्र समन्वयक विवेकानंद जगदाळे (मुख्याध्यापक शाळा. नागोबाचीवाडी) देवगाव शाळेचे मुख्याध्यापक नागनाथ चोबे यांचे संपूर्ण मार्गदर्शन लाभले.शाळेतील नोडल शिक्षक विलास लंगोटे यांनी नवीन निकषानुसार तंबाखू मुक्त  अभियान शाळेत राबवले आहे. शाळेने नवीन वर्षात नऊ दिवसात  नऊ निकष पूर्ण करून  तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
  या यशाबद्दल शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड. उपशिक्षणाधिकारी संजय जावीर. गटशिक्षणाधिकारी      श्रीम. साधना काकडे,शिक्षणविस्तार अधिकारी लक्ष्मीकांत जाधव,केंद्रप्रमुख धनाजी जाधवर आदींनी शाळेचे अभिनंदन केले.

Leave a Reply