ड्राय फ्रुटच्या किंमतीत मोठी घट,स्वस्तात खरेदो करू शकता बदाम,काजु

मुंबई: दसरा आणि दिवाळी हे सण आता अगदीच जवळ आले आहेत. त्यामुळे या सणासुदीच्या काळात सुक्या मेव्याची (Dry Fruits) बरीच वाढते. ज्यामुळे याच्या किंमती देखील वाढतात. लोकं दिवाळीच्या मुहूर्तावर गिफ्ट म्हणून आपल्या नातेवाईकांना, मित्र मंडळींना ड्राय फ्रूट्स (काजू, बदाम, पिस्ता) देतात. पण जर हेच ड्रायफ्रूट्स आपण आताच घेऊन ठेवले तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. कारण सध्या ड्रायफ्रूट्सचे दर खूपच कमी झाले आहेत. ज्यामध्ये काजू, पिस्ता यांचा समावेश आहे. सर्वाधिक घट ही काजू, बदाम आणि पिस्ता यांच्या दरामध्ये झाली आहे.
जुन्या दिल्लीतील फेमस ड्राय फ्रूट्स बाजारातील नूरी मसालेवाले आकीफ आझम यांनी टाइम्स नाऊशी बातचीत करताना म्हटलं की, बाजारातील परिस्थिती ही अतिशय खराब आहे.
नाही तर या सिझनमध्ये ड्राय फ्रूट्सचे दर हे नेहमीच चढे असतात. पण यंदा कोरोना व्हायरस या साथीच्या रोगामुळे संपूर्ण बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. त्यांचं म्हणणं आहे की, ड्राय फ्रूट्समधील दरांमध्ये सर्वाधिक घट ही बदाम, काजू आणि पिस्त्यामध्ये झाली आहे. अक्रोड, अंजीर, मनुके यासारख्या ड्रायफ्रूट्समध्ये फार काही फरक पडलेला नाही.
आकिफ आजम यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन बदाम हे ९०० रुपये प्रति किलो होते. ज्यामध्ये घट होऊन त्याची किंमत ही ६६० रुपये प्रति किलो एवढी झाली आहे. काजू ११०० रुपये प्रति किलो होते ज्यामध्ये घट होऊन आता ९५० रुपये प्रति किलो एवढे झाले आहेत. पिस्त्याची किंमत १४०० रुपये एवढी होती जी आता ११०० रुपये एवढी झाली आहे. तर ४०० रुपये किंमतीचे मनुके आता ३५० रुपयांनी विकले जात आहेत. अक्रोडच्या दरामध्ये फार काही घट झालेली नाही. पूर्वी ७६० रुपये किलोचे अक्रोड आता ६८० रुपये किलोने विकले जात आहेत.
खरं तर सुक्या मेव्याची मागणी ही सर्वाधिक मिठाईची दुकाने, हॉटेल, लग्न कार्यामधील जेवणासाठी असते. पण कोरोना व्हायरसमुळे हॉटेल व्यवसाय हा नुकताच कुठे सुरु झाला आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांकडून म्हणावी तशी मागणी नाही. मिठाईची मागणी देखील कमी झाली आहे. त्यामुळे देखील सुका मेव्याची मागणी कमी झालेली आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, बदाम आणि मनुका वगळता इतर ड्राय फ्रूट्स हे गरम असतात, म्हणून हिवाळ्यामध्ये ते अधिक खाल्ले जातात. तर उन्हाळ्यात मिठाई, आइस्क्रीम उद्योगात त्यांचा जास्त वापर केला जातो.