October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

डाॅ.व्ही.एन.शिंदे यांच्या ग्रंथास शासनाचा पुरस्कार

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज

बार्शी तालुक्यातील चिंचोली येथील डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी लिहिलेल्या ‘आवर्त सारणी व मुलद्रव्यांची दुनिया’ या ग्रंथास महाराष्ट्र शासनाचा एक लाख रूपयांचा महात्मा जोतिराव फुले पुरस्कार जाहीर झाला आहे. दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकातील उत्कृष्ट ग्रंथाना राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाड.मय पुरस्कार प्रदान करण्यात येतात. २०१९ सालामध्ये प्रसिद्ध झालेल्या ग्रंथासाठीचे पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले त्यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान गटातील उत्कृष्ट ग्रंथासाठीचा हा पुरस्कार डॉ. शिंदे यांच्या ग्रंथास जाहीर झाला आहे. २०१९ हे वर्ष युनोने आंतरराष्ट्रीय आवर्त सारणी वर्ष म्हणून साजरे केले. त्याचे औचित्य साधून त्यांनी ‘आवर्त सारणी व मुलद्रव्यांची दुनिया’ हे पुस्तक २०१९ मध्ये प्रकाशित केले. यामध्ये रसायनशास्त्रातील सर्व ११८ मूलद्रव्यांची माहिती देण्यात आली आहे. कोरोनाचे संकट असूनही हे पुस्तक विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये लोकप्रिय ठरले.
डॉ. शिंदे यांचे हे चौथे पुस्तक आहे. यापूर्वी एककांचे मानकरी, असे घडले भारतिय शास्त्रज्ञ, हिरव्या बोटांचे किमयागार ही तीन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. ते सातत्याने विज्ञान प्रसारासाठी विविध नियतकालिकातून लेखन करत आहेत. यापूर्वी त्यांच्या एककांचे मानकरी या ग्रंथास दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा कृ.गो. सुर्यवंशी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या ब्लॉगवरही विविध विज्ञान विषयावरील लेख प्रसिद्ध करतात. विविध वृत्तपत्रातून आणि मासिकातून नियमित सदर लेखन केले आहे. त्यांचे एककांचे मानकरी हे पुस्तक पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या एम.ए. मराठी अभ्यासक्रमामध्ये अभ्यासाला आहे. तसेच हिरव्या बोटांचे किमयागार या पुस्तकातील दादाजी खोब्रागडे यांच्या जीवनावरील लेख शिवाजी विद्यापीठाच्या बी.ए. मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे.
ते शिवाजी विद्यापीठ येथे सध्या उपकुलसचिव म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी सोलापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचे ते उपकुलसचिव होते. तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. प्रशासकीय कामकाजातही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. शिवाजी विद्यापीठाला जलस्वंयपूर्ण बनवण्यासाठी जलयुक्त विद्यापीठ ही माहीम त्यांनी राबवली. तसेच सोलापूर, नांदेड आणि कोल्हापूर येथे विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड आणि संवर्धनाचे कार्य केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल पांगरी पंचक्रोशीतील सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply