June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

ट्रकचे नंबर बदलुन फसवणुक, तिघांवर वैरागात गुन्हा दाखल

वैराग:महाराष्ट्र स्पीड न्युज

संगणमत करुन स्वतःच्या फायद्यासाठी वाहनावरील मुळ नंबर खोडुन बनावट नंबर टाकुन, दिशाभुल करुन शासनाची फसवणुक केल्याचा प्रकार वैराग ता.बार्शी येथे उघडकीस आला.याप्रकरणात तिघांवर वैराग पोलीस ठाण्यात फसवणुकीसह ईतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
#आसाराम विष्णु ठोसर रा. गेवराई ता. गेवराई जि. बिड , महारुद्र पाडुरंग गायकवाड व बाळु माणिक गरकल अशी याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.

Advertisement

#पो.शिपाई सचिन  मुंडे, नेमणूक वैराग पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दाखल केली आहे.
पोलीस निरीक्षक सो।, वैराग पोलीस ठाणे यांचे आदेशान्वये गोपनिय अंमलदार म्हणून काम कर्तव्यावर कार्यरत आहे. सकाळी 09/30 वा. चे सुमारास मी सोबत पोसई राठोड सो।, पोहेक़/1484 गवळी, पोना/1673 लोकरे, असे पोलीस वैराग शहरात पेट्रोलींग करत असतांना वैराग ते बार्शी रोडवर हटेल सोमोश्वर जवळ रस्त्यालगत एक पांढऱ्या रंगाची बोलेरो जीप उभा दिसली त्यांचे बाजूला तीन ट्रक उभा होत्या त्यापैकी सदर पांढऱ्या रंगाच्या बोलेरो जीपला समोरील बाजूस नंबर प्लेट नव्हती व मागील बाजूस MH 16 AT व पुढील आकडे जानिवपुर्वक खोडलेले दिसुन आल्याने त्याचा आम्हास संशय आल्याने आम्ही सदर चालकास विचारपुस केली असता त्याने आम्ही ऊसतोड कामगार आहोत या तिनही ट्रक आमच्याच आहेत. आम्ही इंडीयन शुगर कारखाना कापसी येथे करार केला असुन त्या कारखान्यास ऊसतोड वाहतुक करतो. असे सांगीतले त्यानंतर आम्ही सदर तिनही ट्रकची पाहणी केली असता त्या मध्ये MH 17 C 7069, MH12 AQ 1328, MH 19 J 3614 असे नंबर हाताने खोडुन ट्रकला मागे-पुढे बनावट नंबर लावलेले दिसले त्यामुळे आम्हास त्याचा संशय आल्याने सदची चारही वाहने पुढील योग्य त्या कारवाई करीता पोसई / राठोड यांनी सी.आर.पी.सी. 41(1) प्रमाणे ताब्यात घेऊन चौकशी केली असता चौकशीमध्ये आसाराम विष्णु ठोसर रा. गेवराई ता. गेवराई जि. बिड याने गाडी क्र. MH 18 M 2766 हा नंबर खोडून MH 19 J 3614 हा नंबर टाकला . महारुद्र पाडुरंग गायकवाड याने गाडी क्र. MH 26 B 4728 हा नंबर खोडून MH 12 AQ 1328 हा नंबर टाकला व बोलेरो गाडी क्र. MH 16 AJ 3853 हा नंबर खोडुन MH 16 AT हा नंबर टाकला. बाळु माणिक गरकल याने गाडी क्र. MH 12 AQ 3653 हा नंबर खोडून MH 17 C 7069 हा नंबर टाकुन वरील वाहने इंडियन शुगर कारखाना कापशी येथे ऊसाची वाहतुक स्वतःचे फायद्यासाठी करुन शासनाची फसवणुक केली आहे.तरी वरील इसम क्र.आसाराम विष्णु ठोसर रा. गेवराई ता. गेवराई जि. बिड, महारुद्र पाडुरंग गायकवाड व  बाळु माणिक गरकल यांनी संगणमत करुन स्वतःच्या फायद्यासाठी वाहनावरील मुळ नंबर खोडुन बनावट नंबर टाकुन, दिशाभुल करुन शासनाची फसवणुक केल्याने त्यांचे विरुध्द भा.द.वि. कलम 420, 468, 483, 34 प्रमाणे सरकार तर्फे गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply