November 29, 2022

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

जे स्वप्न तुम्ही बघितले त्यावर ठाम रहा :  किरण जमदाडे

बार्शी:

मालवंडी ता.बार्शी येथील श्री शेखा गौरी परिवार आणि राष्ट्र बांधव अकॅडमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वाचनालयाचे उद्घाटन आणि स्पर्धा परीक्षा साठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुने  म्हणुन तालुका खटाव जिल्हा सातारा येथील तहसीलदार किरण जमदाडे  आणि यशदाचे मार्गदर्शक भाग्यश्री वठारे उपस्थित होते
    यावेळी जमदाडे  म्हणाले की खेड्यातील मुलांनी मनामध्ये कुठलीही भीती न बाळगता स्वप्न बघितले पाहिजे  स्वप्न पूर्ण केले पाहिजे कुठलाही अधिकारी बनायचे असेल तर त्यासाठी योग्य दिशा ठरवून योग्य मार्गदर्शन घेणे आवश्यक असते आपल्याला काय करायचे आहे कुठला अधिकारी बनायचे आहे आपण ठरवले पाहिजे जो मार्ग निवडला आहे  त्यावर ठाम राहून यश मिळवले पाहिजे सोलापूर जिल्ह्यामध्ये मालवंडी हे गाव आधीकरायचे गाव म्हणून ओळखले पाहिजे माझ्याकडून कोणतीही मदत लागू  मी ती नक्कीच पूर्ण करणार असे आस्वासन दिले यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यातील काही प्रसंग सांगून  मोलाचे मार्गदर्शन केले
    यावेळी वठारे म्हणाले की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र पर्यावरण सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी हे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी विषय असतात त्याचा सखोल अभ्यास करणे महत्त्वाचे आहे वाचनाची आवड निर्माण करून लक्ष केंद्रित केले पाहिजे   दिवसाच्या चौस तासाचे वेळापत्रक करून त्यानुसार अभ्यास केला पाहिजे कुठला पेपर कसा सोडवला पाहिजे कुठल्या पेपर ला किती मार्क असतात असी  स्पर्धा परीक्षेसाठी कुठली कुठली पुस्तके लागतात सखोल माहिती सांगून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 40 पुस्तके  शेखा गौरी  वाचनालयाला भेट दिली याच वेळी घुले सर यांनी एक लाख रुपयाची पुस्तके शेखा गौरी वाचनालयाला देण्याची आश्वासने दिली
यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत थोरात विष्णू घोडगे पवार सर  विश्वनात  होनराव सर  शिवकुमार होनराव विजय  कुलकर्णी सर  या मान्यवरांनी मार्गदर्शन केले यावेळी पोलीस पाटील पांडुरंग सलगर आप्पा  विभुते अनिल पाटील शिवाजी नरोटे नवनाथ गवळी रामभाऊ घेवारे इन्नुस् मुजावर  सोमनाथ थोरात धन्य कुमार साखरे आदी मान्यवर तसेच विद्यालयातील   शिक्षक  विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते या  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ दहीवडकर  प्रस्तावना सचिन दहीवडकर   आभार प्रदर्शन सांडे यांनी मानले या कार्यक्रमासाठी प्रथमेश खंडागळे समाधान काटे  आणि शेखा  गौरी परिवार यांनी परिश्रम घेतले

Advertisement

Leave a Reply