October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

जुने फोन,लॅपटॉप विक्री करताना ही घ्या काळजी ,नाहीतर…

बरेच लोक त्यांचे जुने स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा टॅब विकतात किंवा ईकॉमर्स साइटवर एक्सचेज करुन घेतात. पण जेव्हा आपण एखादे जुने डिव्हाइस विकता तेव्हा काही गोष्टीची काळजी घेणे गरजेचे असते. बऱ्याचदा आपण जून्या डिव्हाइसमध्ये आपले महत्वाचे फोटो, व्हिडिओ, सोशल मीडिया खाते आणि जीमेल इ. लॉगिन असेल आणि त्यावर बँक संबंधित ओटीपी देखील येत असतील तर अशा वेळी थोडीशी चूक केल्याने आपले मोठे नुकसान होऊ शकते. जुने, लॅपटॉप, स्मार्टफोन आणि टॅबची विक्री करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते आज आपण जाणून घेणार आहोत.

Advertisement

1 – फोन Factory Reset करा

आजकाल बरेच जण त्यांची कार्यलायीन कामे देखील फोनवर करतात, बँकेशी संबंधित व्यवहार देखील फोनवरच होतात.

जर तुम्ही क्लिनअप किंवा फॅक्टरी रीसेट न करता फोनची विक्री केली तर आपली बँकेची माहिती किंवा पासवर्ड दुसऱ्याला कळू शकतो. यापासून बचावासाठी फोनच्या सेटींग्स ​​मध्ये जा आणि त्यामध्ये तुम्हाला फॅक्टरी रीसेटचा पर्याय मिळेल, त्यावर आणि सोबतच फोनमधील सर्व डेटा डिलीट करा. पण त्यापूर्वी हा सर्व डेटा आपल्या नवीन फोनवर ट्रान्सफर करायला विसरु नका.

2 – बॅकअप घ्या

स्मार्टफोन विकण्यापूर्वी तुम्हाला आवश्यक डेटाचा बॅकअप घेणे आवश्यक आहे. आपण हा बॅकअप Google ड्राइव्हवर देखील घेऊ शकता, जेणेकरून जेव्हा आपण आपल्या जीमेल खात्यावर नवीन फोनमध्ये लॉग इन कराल, तो डेटा आपल्याकडे परत येईल.

3 – लॅपटॉप विक्रीपूर्वी हे नक्की करा

लॅपटॉप विक्री करण्यापूर्वी तो पुर्णपणे फॉरमॅट करा. कधीकधी काही हॅकर्स काढून टाकलेला डेटा देखील रिकव्हर करतात. अशा परिस्थितीत आपण लॅपटॉप विकण्यापूर्वी, शेयरश्रेडर सॉफ्टवेअर वापरा, जे आपल्या लॅपटॉपमधील डेटा पूर्णपणे काढून टाकेल. जो पुन्हा रिकव्हर केला जाऊ शकत नाही.

4 – लॅपटॉप कसा क्लिन कराल

लॅपटॉप क्लिन करण्यासाठी ब्राउझरमध्ये fileshredder.org टाइप करा आणि सॉफ्टवेअर फाईल डाउनलोड करा. सॉफ्टवेअर इंस्टॉल केल्यानंतर, एक विंडो उघडेल, ज्यामध्ये फाइल्स, अ‍ॅड फोल्डर आणि शेअर्ड फ्री डिस्क स्पेस हे तीन पर्याय दिसतील. लॅपटॉपचा डेटा डिलीट केल्यानंतर तुम्हाला शेअर्ड फ्री डिस्क स्पेसचा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर हार्ड डिस्कसह इतर ठिकाणी सेव्ह केलेला डेटा पूर्णपणे हटवला जाईल.

Leave a Reply