जीवनानंद घेण्यासाठी काव्य प्रतिभेचे सादरीकरण महत्वाचे; डॉ परमेश्वर पाटील

सोलापूर ;महाराष्ट्र स्पीड न्युज
बार्शी येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने काव्य सादरीकरण या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा हेतू प्रशिक्षणार्थींचा सर्वांगिण व समतोल विकास साधणे असा होता. प्राचार्य डॉ एस एस गोरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी समन्वयक डॉ एस डी भिलेगावकर यांनी प्रास्ताविक द्वारे उद्देश स्पष्ट केला. प्राचार्य डॉ एस एस गोरे यांनी काव्य सादरीकरण कार्यक्रमाचे उदघाटन केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ पी ए पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी भावनांची उत्कटता , जे न दिसे रवि ते दिसे कवी, या संकल्पनांचा अर्थ सांगितला. कविता जन्मावी लागते, कविता म्हणजे कवीने निर्माण केलेली सृजनशील शब्द मांडणी असते, कविता सादर करताना गेयता असावी, हृदयापासून सादर करावी, उच्चार शुद्धतेने श्रोत्यांना श्रवण झाली पाहिजे असे विचार मांडले.
या ऑनलाईन काव्य सादरीकरण कार्यक्रमात बी एड प्रशिक्षणार्थी शुभांगी राजुरे, योगिता झाडे, वर्षाराणी मेंडगुळे, पल्लवी दळवी, विनय पवार, संज्योती जाधव, प्रियंका नरखडे, प्राजक्ता काळे यांनी सहभाग नोंदवला.
तसेच समन्वयक डॉ एस डी भिलेगावकर ( निसर्ग कविता), नॅक समन्वयक डॉ व्ही पी शिखरे (प्रेम कविता) व डॉ एम व्ही मते ( अंगाई गीत) याप्रकारे ऑनलाईन काव्य सादरीकरण केले.
या कार्यक्रमामुळे प्रशिक्षणार्थींना कोव्हीड काळात एक नवीन काव्य प्रतिभा ऊर्जा मिळाली. सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ एस डी भिलेगावकर यांनी आभार व्यक्त केले.