October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

जिल्ह्यातील शाळा बंद ठेवा, दलित महासंघाचे जिल्हाधिका-यांना निवेदन

सोलापूर;महाराष्ट्र स्पीड न्युज

महाराष्ट्र राज्यात सगळीकडे कोरोना ची लाट येण्याचे संकेत असताना तसेच सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाही जिल्हा प्रशासनाच्या वतीने  शाळा सुरू करण्याचा घाट घातला जात आहे लवकरच  येणाऱ्या काळात थंडी मुळे  कोरोना रोगाची साथ मोठ्या प्रमाणात वाढणार आहे राज्यात अनेक ठिकाणी शाळा बंदीचा निर्णय घेण्यात आलेला आहे.  मात्र सोलापूर जिल्ह्यात शाळा सुरू करत चालवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत सदरचा हा निर्णय गैर आहे अनेक संस्थाचालक केवळ फी त्वरित जमा करण्यासाठी शाळा सुरू करीत आहेत अनेक ठिकाणी शाळा कोवाड सेंटर होत्या त्या स्वच्छ केले गेल्या नाहीत मुलांच्या चाचण्या घेतल्या नाहीत असे असताना शाळा सुरु करणे  चुकीचे आहे हे शाळा सुरु करणे म्हणजे पालक विद्यार्थी व शिक्षक यांच्या सामुदायिक आरोग्याच्या बरोबरच त्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण होणे आहे.
  अनेक मुख्याध्यापक केवळ आपल्या सहकाऱ्यांना वेठीस धरून पालकांकडून जबरदस्तीने संमती पत्र लिहून घेताना दिसुन येत  आहेत या सर्व बाबींचा विचार करून शाळा त्वरित बंद करण्याचे आदेश माननीय जिल्हाधिकारी यांनी द्यावेत अशी विनंती दलित महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे ,तालुकाध्यक्ष संगीतराव शिंदे,  शहराध्यक्ष संदीप आलाट,  तालुका उपाध्यक्ष कैलास आडसूळ , आदींनी केली आहे.
महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे महाराष्ट्रात कोरोना ची लाट येणार असे सांगत असतानाही शाळा का सुरू केल्या जात आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे.
   शिक्षक मतदार संघ व पदवीधर मतदार संघाच्या निवडणूका सोप्या जाव्यात याकरिता शाळा उघडी ठेवून विद्यार्थी व पालक शिक्षक यांच्या आरोग्याशी खेळ खेळण्यात येत आहे का असाही सवाल उपस्थित केला गेला आहे त्वरित शाळा बंद करण्याचा निर्णय घ्यावा अन्यथा दलित महासंघ जबरदस्तीने शाळा बंद पाडेल असे जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे यांनी निवेदनात नमूद केले आहे

Advertisement

Leave a Reply