November 29, 2022

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

जामगाव (आ) ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी गंगुबाई जगताप तर उपसरपंचपदी विष्णू आवटे


बार्शी ;
जामगाव ( आ) ता.बार्शी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी गंगुबाई शिवाजी जगताप सर उपसरपंचपदी विष्णू आवटे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी संभाजी दिगंबर  माने यांनी घोषित केले
     नऊ सदस्य असलेल्या जामगाव ग्रामपंचायत च्या निवडणुकीच्या स्थानिक नेते बाळासाहेब जगताप व त्यांच्या मित्र मंडळानी ग्रामस्थ व युवक यांच्या सहकार्याने बिनविरोध झाली होती सरपंच पदासाठी गंगुबाई जगताप व उपसरपंच पदासाठी विष्णू आवटे यांचेच प्रत्येकी एकेक अर्ज दाखल झाला होता.
  सभेचे प्रोसिडिंग  वाचन  ग्रामसेवक माळवे  आर .एन. यांनी केले व निवडणूक साहाय्यक म्हणून तलाठी राठोड के .बी .यांनी काम पाहिले
       याप्रसंगी नुतन ग्रामपंचायत सदस्या अनुराधा बालाजी कागदे , गंगुबाई जगताप, प्रियंका गडदे, शीतल अडसूळ  प्रियंका गडदे,विष्णू  आवटे ,बाळू  जाधव, अमर  ठोंबरे , प्रकाश आडसूळ यांच्यासह विठ्ठल चित्राव, विजय आवटे, बबन गडदे ,बाळासाहेब जगताप,गुणवंत कुरळे विशाल खंडागळे, तुकाराम गडदे, बालाजी कागदे, अफसर मुलांनी सतीश खंडागळे अमोल आवटे राजेंद्र गडदे गोविंद गडदे, भगवान इंगळे बजरंग ठोंबरे बापू ठोंबरे अमर कागदे प्रशांत पाटील तुषार गडदे ऋषी आवटे उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply