June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

जाचहाट; नळदुर्ग येथील सासरच्या लोकांवर बार्शीत गुन्हा दाखल

#सोलापूर; महाराष्ट्र स्पीड न्युज

लग्नात मानपान वयवस्थित केला नाही व माहेरुन रिक्षा धंद्यासाठी 1 लाख रुपये घेवुन ये असे म्हणुन वेळोवेळी मानसिक त्रास देवुन शिवीगाळी दमदाटी करुन जाचहाट केल्याचा प्रकार नळदुर्ग जि.उस्मानाबाद येथे घडला. याप्रकरणी पती,सासु, आसरा ,दिर ,ननंदेविरूद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात जाचहाट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

@सचिन देडे(पती) , ज्ञानेश्वर  देडे (सासरा), मंगल ज्ञानेश्वर देडे(सासु), तिघे रा इंदीरानगर नळदुर्ग जि उस्मानाबाद, नितीन देडे(दिर) रा काळभोर नगर निगडी पुणे, रेखा तानाजी अडगळे(ननंद) रा पवनेर जि उस्मानाबाद , व युवराज इंद्रा काकडे रा बावी (आ) ता बार्शी अशी याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

#सौ रुपाली सचिन देडे वय 22 रा इंदीरानगर नळदुर्ग हल्ली झाडबुके मैदान बार्शी यांनी फिर्याद दिली आहे.
त्यांचे लग्न सन 04/05/2017 मध्ये सचिन  देडे यांचेशी  त्यांचे घरी नळदुर्ग येथे झालेले आहे लग्नात वडीलांनी सचिन यास 4 तोळे सोने दागिणे व संसारउपयोगी साहीत्य व दोन्ही बाजुने खर्च करुन दिले होते सदर लग्नात वडीलांनी सुमारे 3 लाख रुपये खर्च केलेला होता. त्यांनतर फिर्यादी नळदुर्ग येथे सासरी नांदणेस गेल्या.
  काही दिवसांनी सासु सासरे व नवरा यांनी लग्नात काही मानपान केलेला नाही असे म्हणुन शिवीगाळी करण्यास तसेच उपाशी ठेवण्यास सुरुवात केली त्यांनतर फिर्यादीने आई वडीलांना व भावांना सदर बाबत कळविले त्यांनतर  आई वडील व भाउ असे नळदुर्ग येथे येवुन  पती व सासु सासरे यांना समजावुन सांगुन आम्ही आणखी मानपान करु आमची परिस्थिती व्यवस्थीत झालेली नाही लग्नात भरपुर खर्च झालेला आहे असे त्यांना समजावुन सांगुन ते निघुन गेले.
त्यांनतर पुन्हा दोन महीण्यांनी तुझे आई वडीलाकडुन धंदा करणे साठी रिक्षा घ्यावयाची आहे तरी 1 लाख रुपये घेवुन ये असे म्हणुन तगादा लावुन  शिवीगाळी करण्यास सुरुवात केली त्यावेळी आई वडीलांना फोन करुन  नवरा सचिन व सासु सासरे हे खुप त्रास देवु लागले आहे त्यांना काही तरी करुन पैसे दया असे म्हणाल्याने फिर्यादीचा भाउ सुरज  खंडागळे, करण , आई वडील असे नळदुर्ग येथे आले व 50 हजार रुपये दिले. त्यानंतर भोड्या दिवसांनी पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली व पैशाची मागणी केली.याबाबत बार्शी शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply