October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

जागतिक महिला दिनानिमित्त न पा शिक्षण मंडळ बार्शी तर्फे कर्तृत्ववान महिला शिक्षकांचा सन्मान

बार्शी ;
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून न पा प्राथमिक शिक्षण मंडळ, बार्शी यांच्या वतीने  शहरातील नगरपालिका, खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील कर्तृत्ववान महिला शिक्षिकांचा सन्मान सोहळा सौ. हि. ने. न. शाह कन्या प्रशाला येथे संपन्न झाला.

Advertisement

   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री अनिल बनसोडे, प्रशासन अधिकारी, न पा शिक्षण मंडळ, बार्शी,प्रमुख पाहुणे सौ. मिनाक्षी वाकडे,  वित्त व लेखाधिकारी वर्ग-१ ,नगरपालिका बार्शी, श्री संजय पाटील,पर्यवेक्षक न पा शिक्षण मंडळ,बार्शी,श्रीम उज्वला व्हनाळे ,मुख्याध्यापिका,सौ. हि. ने. न. शाह कन्या प्रशाला,बार्शी,श्री विक्रम टकले, मुख्याध्यापक,टेक्निकल हायस्कूल,बार्शी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. 

       कार्यक्रमाच्या प्रास्तविक भाषणात न पा प्राथमिक  शिक्षण मंडळ, बार्शी राबवित असलेल्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची माहिती व महिला दिनाचे महत्त्व श्री संजय पाटील यांनी सांगितले.त्यानंतर शहरातील ३४ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सत्कार मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, प्रमानपत्र ,गुलाबपुष्प देऊन करण्यात आला.यावेळी सत्कार प्राप्त काही शिक्षिकांनी आपली मनोगते  व्यक्त करताना आजच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले .प्रत्येक स्त्रीने राष्ट्राच्या जडघडणीत बहुमोल असे योगदान देऊन प्रत्येक क्षेत्रात चांगले करावे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून प्रशासनातही योगदान दयावे असे प्रमुख पाहुण्या सौ मिनाक्षी वाकडे यावेळी म्हणाल्या. स्रियांनी आत्मनिर्भर होऊन देशाच्या विकासात योगदान देऊन शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात प्रगती करावी. विविध प्रेरणादायी स्त्रियांचा उल्लेख अध्यक्षीय भाषणात अनिल बनसोडे यांनी केला.  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ,सौ. हि. ने. न. शाह कन्या,प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिमन्यू सातपुते यांनी तर आभार आधार भालेराव यांनी मानले.

Leave a Reply