June 9, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

जागतिक महिला दिनानिमित्त बार्शी लेडीज सायकलिंग क्लबची स्थापना…

बार्शी ;
आज संपूर्ण जगभरामध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत बार्शी मध्ये कुमारी ईश्वरी विशाल मोरे यांच्या संकल्पनेतून महिलांना एक वेगळं व्यासपीठ मिळण्यासाठी आणि महिलांना संधी मिळण्यासाठी बार्शी लेडीज सायकलिंग क्लब ची स्थापना करण्यात आली. श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास समोर बार्शी लेडीज सायकलिंग क्लब ची स्थापना करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा देऊन, कार्यक्रमाच्या प्रास्ताविकमध्ये सायकलिंग क्लबच्या संचालिका कुमारी ईश्वरी मोरे यांनी आपला बंधू सुमान्यू मोरे याने बार्शी ते रायगड सायकल प्रवास करून एक वेगळा विक्रम प्रस्थापित केल्याने तीच प्रेरणा घेऊन, शालेय मुली, महाविद्यालयीन मुली, खेळाडू आणि महिलांसाठी त्यांच्यामधील कलागुणांना वाव देण्यासाठी आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी या क्लबची स्थापना करत असल्याचे म्हटले. आजच्या या स्पर्धेच्या काळामध्ये टिकून राहण्यासाठी आणि आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये उतरून नारी शक्ती सिद्ध करायला हवी. बार्शी सारख्या ठिकाणी अशा प्रकारच्या महिला सायकलिंग क्लबची स्थापना होत  आहे हि कौतुकास्पद बाब आहे तसेच बार्शीतील महिला व युवतींसाठी एक खूप मोठी सुवर्णसंधी असल्याचे जेष्ठ साहित्यिका प्रा. भारती रेवडकर यांनी आपल्या मनोगतात म्हटले. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय स्तरावर नृत्य प्रकारात विविध पारितोषिके मिळवून बार्शीची मान उंचावणारी कु रचना राहुल काळे हिचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी उपस्थित गुंजन शहा, गौरी रसाळ, श्वेता मोरे, संगीता पवार, रचना काळे, गणेश गोडसे, प्रमोद शिंदे, ऍड श्याम झालटे, योगेश बडवे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बार्शी सायकलिंग क्लबचे विशाल मोरे, ऍड श्याम झालटे, उन्मेष पोतदार, योगेश बडवे, अजित मिरगणे, शिवनेरी पब्लिक स्कुलचे संस्थापक धिरज शेळके, पत्रकार गणेश गोडसे, पत्रकार मल्लिनाथ धारूरकर, मुक्ताई डिजिटलचे संचालक प्रमोद शिंदे, सुमान्यू मोरे, श्वेता मोरे, गुंजन शहा, गौरी रसाळ, संगीता पवार, राजश्री गवळी, जयश्री पोतदार, रचना काळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धिरज शेळके यांनी केले तर आभार विशाल मोरे यांनी मानले.

Leave a Reply