June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य शिबिरात २७५ महिलाची आरोग्य तपासणी

बार्शी ;
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब बार्शी राँयल ,इनरव्हील क्लब, डाँ हिरेमठ हाँस्पिटल याच्या सयुक्त विद्यमाने येथील हिरेमठ हाँस्पिटल येथे महिलासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते

या शिबीराचे उद्घघाटन बार्शी नगर पालिकेच्या मुख्याधिकारी श्रीमती अमिता दगडे – पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर सौ उज्वलाताई स़ोपल, सौ सीमा काळे,सौ हेमा कांकरिया, उपस्थित होत्या या शिबिरात डाँ स्नेहल दोशी (माढेकर) डाँ मंजुषा कुलकर्णी डाँ क्षमा बकाल या तज्ञ महिला डाँक्टरांच्या मार्गदर्शनाखाली २७५ महिलांच्या शुगर टेस्ट,हिमोग्लोबीन,ब्लड प्रेशर,इ सी जी,त्वचेचे आजार,कँन्सर,इत्यादी चाचण्या म़ोफत करण्यात आल्या या शिबिराला माजी आमदार दिलीप सोपल यांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले तसेच महिलादिनाच्या शुभेच्छा दिल्या या शिबिरासाठी इनरव्हील क्लब,लायन्स क्लब बार्शी राँयल याच्या सर्व पदाधिकारी सदस्य तसेच हिरेमठ हाँस्पिटलच्या सर्व मेडिकल स्टापने परिश्रम घेतले

Leave a Reply