March 23, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

जागतिक अपंग दिनानिमित्त गरजूंना साहित्य वाटप व कोवीड योध्याचा सन्मान –बार्शी ;-महाराष्ट्र स्पीड न्युज
स्वप्नपूर्ती सकल दिव्यांग बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने बार्शी तालुक्यातील बावी (आ) येथे जागतिक अपंग दिनानिमित्त  गरजूंना ब्लँकेट व साहित्याचे वाटप करण्यात आले.तसेच कोरोना महामारीच्या काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कोवीड योध्याचा सन्मान यावेळी करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य समाधान डोईफोडे होतें.प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सोनाली आगलावे,चित्रकार महेश मस्के,प्रा शांतीलाल काशीद,पोलीस पाटील राहुल उंबरे,प्रहार संघटनेचे मंगळवेढा तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे,उपाध्यक्ष सिद्धराया माळी उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष विष्णू आगलावे, उपाध्यक्ष नागनाथ उंबरे, सचिवा कविता करडे,सहसचिव विठ्ठल आगलावे, खजिनदार परशुराम उंबरे,सदस्य कैलास करडे, प्रफुल पाटील शंकर आगलावे,वशिष्ठ आगलावे,बावी ग्रामस्थ व संस्थेचे सदस्य यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक शंकर आगलावे यांनी केले.बावी गावचे ग्रामदैवत खंडोबा मंदिर येथे समाजातील 70 अपंग तसेच गरजूंना ब्लँकेट,तांदळाचे  उपस्थित मान्यवरांच्या हस्ते
वाटप करण्यात आले.कोरोना महामारीच्या काळात उत्कृष्टपणे सेवा बजावणारे आरोग्य विभागाचे कर्मचारी,विविध संस्था,पत्रकार,पोलीस पाटील,आशा वर्कर,अंगणवाडी सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी यांना संस्थचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
जिल्हा परिषद सदस्य समाधान डोईफोडे यांनी अध्यक्षीय भाषणातुन अपंगांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.तसेच तालुक्यातील अपंग बांधवांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष शिबीर घेणार असल्याचे सांगितले.
जन्मताच एका डोळ्याने अंध असताना चित्रकला,शिल्पकला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे महेश मस्के यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.शंकर आगलावे यांनी अपंग दिनाचा इतिहास सांगत अपंग बांधवानी विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यावर प्रकाश टाकला. याअगोदर कोरोना महामारीच्या काळात रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.आभार विष्णू आगलावे व सूत्र संचालन प्रफुल पाटील यांनी केले.

Advertisement

Leave a Reply