February 3, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

जवाहर हॉस्पिटलमध्ये कोव्हिड केअर सेंटर सुरू करून न.पा.च्या खर्चाने शहर वासीयांना मोफत लसीकरण करा : नागेश अक्कलकोटे

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

बार्शी नगर परिषद अखत्यारीत जवाहर हॉस्पिटलमध्ये कोव्हिड  केअर सेंटर सुरू करून नगरपरिषदेच्या खर्चाने बार्शी शहर वासीयांचे मोफत लसीकरण वेगवान करावी अशी मागणी बार्शी नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते नागेश अक्कलकोटे यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाअधिका-यांकडे केली आहे.ञ

निवेदनात म्हटले आहे की बार्शी शहर व परिसरात दिवसेंदिवस कोव्हिड रुग्णांची संख्या वाढीचे प्रमाण लक्षात घेता उपलब्ध असणारी डेडिकेटेड कोव्हिड सेंटर यामधील उपलब्ध बेडची संख्या लक्षात घेता सर्व सामान्य व गरीब रुग्ण उपचारापासून लांब राहत आहे. पर्यायी मृत्यू ओढवतो आहे . तसेच डेडिकेटेड कोव्हीड सेंटर मधील खर्च सामान्यांना न परवडणारा आहे .या संपूर्ण पार्श्वभूमीवर बार्शी नगरपरिषद बार्शी च्या वतीने जवाहर हॉस्पिटल च्या इमारतीमध्ये कोव्हीड  केअर सेंटर सुरू करून अत्यल्प आणि सवलतीच्या दरात कोव्हिड रुग्णांवर उपचार करण्यात यावेत. यासाठी शासनाने ठरविल्याप्रमाणे तात्पुरता हॉस्पिटल स्टाफ नेमणेची कार्यवाही करण्यात यावी . त्याचप्रमाणे सदर कार्यवाही साठी संबंधित ना तात्काळ आदेश देऊन कार्यवाही च्या सूचना देण्यात याव्यात .आवश्यकता भासल्यास नगरपरिषदे ची विशेष सभा बोलवणे बाबत सूचित करण्यात यावे .तसेच कोव्हीड रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी यापूर्वीही आम्ही मागणी केल्याप्रमाणे  बार्शी नगर परिषद बार्शी च्या वतीने लसीकरणाचा संपूर्णता खर्च उचलून मोफत लसीकरण  वेगवान पद्धतीने सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण झाले तर यामुळे कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येण्यास मदत होईल .निवेदनाच्या प्रती पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे ,माजी मंत्री दिलीपराव सोपल,नगराध्यक्ष, मुख्याध्याकारी यांना पाठवल्या आहेत.

Leave a Reply