जलयुक्त मध्ये नावाजलेले खडकोणी ग्रामस्थ का करणार आहेत तहसील समोर उपोषण,वाचा..

सोलापूर; महाराष्ट्र स्पीड न्युज
शेत रस्ता शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी खुला करावा अन्यथा बार्शी तहसील समोर महिलांसह आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा खडकोणी ता. बार्शी येथील शेतकऱ्यांच्या वतीने एका लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. बार्शी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की
खडकोणी गावातील पारडी मार्ग हा शेत रस्ता सर्व्हे नं. ४ व ५ ( जूना सर्व्हे नं. ४८ व ४९) मधील ३४ ते ४९
या गट नंबर मधून जातो. शेतक-यांनी त्या शेत रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे सद्यस्थितीत सदर शेत रस्ता बंद आहे. वरील सर्व्हे नंबरच्या आगोदर व नंतर देखील सदर शेत
रस्ता खुला आहे. पारडी मार्ग हा शेत रस्ता वाहतुकीसाठी खुला नसल्यामुळे या रस्त्यावर
अवलंबून असलेल्या सुमारे ४०० एकर क्षेत्रावरील शेतक-यांचे आतोनात हाल होत आहेत.
शेतीकामे, शेतीमाल व इतर वाहतूक ९ किलोमीटर अंतरावरून गावा शेजारील कोरेगाव
शिवारातून करावी लागत आहे. यामुळे मागिल एका वर्षात २ शेतक-याचे अपघाती निधन झाले आहे.
# हा शेत रस्ता ( पारडी मार्ग) भुमिअभिलेख नकाशा प्रमाणे खूला होण्यासाठी आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अन्यथा दि. २८.०४. २०२१ पासून बार्शी तहसिल कार्यालयासमोर खडकोणी येथील
शेतक-यांच्या कुटुंबातील ५० स्त्रिया व पुरूष सदस्य आमरण उपोषणाला बसणार आहोत व इतर शेतकरी ठिया आंदोलन करणार आहेत.
मागे जलयुक्त शिवार योजनेचे काम सुरू असताना सदर अतिक्रमित रस्ता संपल्यानंतर ओढयाचे खोलीकरण व रूंदीकरण केले असल्यामुळे तत्कालीन तहसिलदार यांनी सदर ठिकाणी सिमेंट बंधारा व त्यावरून रस्ता तातडीने करून देतो असे आश्वासन दिले होते परंतू
अद्याप ते पाळलेले नाही. यामध्ये लक्ष घालून शेतक-यांची अडचण लक्षात घेवून तात्काळ सदर शेतरस्ता, ओढयावरील बंधारा व रोड करून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.