February 3, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठानच्या आंदोलनास आले यश… बार्शी ररस्त्यावरील भांडगाव येथील पुलाचे काम प्रगतीपथावर…

उस्मानाबाद;महाराष्ट्र स्पीड न्युज

उस्मानाबाद जिल्ह्यातील  परंडा आणि भूम तालुक्यामधुन पश्चिम महाराष्ट्रात जाण्यासाठी आवश्यक असलेला  भांडगाव ते बार्शी रस्त्यावरील भांडगाव येथील पूल प्रवाशांसाठी धोकादायक झाला होता.तसेच या पुलावर सतत अनेक अपघात देखील घडू लागले होते. प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनलेल्या या पुलाचे काम त्वरीत पूर्ण करावे, यासाठी छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठानच्या वतीने, प्रतिष्ठानचे आधारस्तंभ शिवश्री रामभाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष धनंजय वळेकर, समाज परिवर्तन महासंघाचे अध्यक्ष अजय पवार, महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचे संस्थापक प्रदीप डोके, कायदेशीर सल्लगार अॅड अनंत राशीनकर, शिवनेरी पब्लिक स्कूलचे अध्यक्ष धीरज शेळके या मान्यवरांच्या  उपस्थितीत परंडा
मधील सार्वजनिक बांधकाम उपविभाग याठिकाणी लाक्षणिक मोर्चा काढून, पूल दुरुस्तीची मागणी करण्यात आलेली होती.
  दिवाळीपर्यंत पुलाचे मार्गी लागले नाही तर  प्रतिष्ठानच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या वेळी देण्यात आलेला होता. छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठानच्या मागणीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने भांडगाव येथील पुलाचे काम तातडीने  सुरू केले आहे. छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठानच्या आंदोलनाला मिळालेल्या यशाबद्दल व प्रवाशांच्या सोयीबद्दल, परंडा व भूम तालुक्यातील जनतेच्या वतीने कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
    प्रतिष्ठान चे आधारस्तंभ शिवश्री रामभाऊ पवार यांनी सदरील विभागाच्या अधिकाऱ्यांसह पत्रकार बांधवांचे आभार मानले. या आंदोलप्रसंगी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, मावळे आणि तालुक्यातील युवक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply