छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीने निलेश वळेकर सन्मानित…..

उस्मानाबाद;- महाराष्ट्र स्पीड न्युज
शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेत ( नीट ) परंडा तालुक्यातील वाकडी येथील निलेश सुनील वळेकर याने 720 पैकी 580 गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. जळगाव येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याबद्दल छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने निलेश वळेकर यांचा प्रतिष्ठानचे आधारस्तंभ शिवश्री रामचंद्र पवार यांच्या हस्ते फेटा, शॉल, श्रीफळ, प्रशस्तिपत्रक, सन्मानचिन्ह आणि 11000/- रुपये रक्कम देऊन सन्मान करण्यात आला. ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या कौशल्याला वाव मिळावा, विविध क्षेत्रात विध्यार्थ्यानी यश संपादन करून आपल्या कुटुंबाचे आणि राष्ट्राचे नाव उज्वल करावे याच हेतूने संभाजीराजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून, विध्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर उपक्रम राबविण्यात येत असल्याचे प्रतिष्ठानचे आधारस्तंभ शिवश्री रामचंद्र पवार यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले. यावेळी प्रतिष्ठानचे मार्गदर्शक नितीनसिंह ठाकूर, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष धनंजय वळेकर, प्रतिष्ठानचे कायदेशीर सल्लागार ऍड. अनंत राशीनाकर, समाज परिवर्तन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अजय पवार, नानासाहेब पवार, काशिनाथ वळेकर, प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि मावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते.