October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन…

उस्मानाबाद;-महाराष्ट्र स्पीड न्युज

छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठानच्या सन २०२१ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन श्री क्षेत्र सोनारी येथील काळभैरवनाथ मंदिराचे मठाधिपती श्री श्री श्री महंत शामनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिका सर्व प्रकारच्या प्रशासकीय कार्यालयामध्ये तसेच सर्वसामान्य जनते पर्यंत विनामूल्य वाटप करण्यात येणार असून, दिनदर्शिकेच्या माध्यमातून प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या सामाजिक कार्याचा आढावा आणि सामाजिक कार्याचा समाजहिताचा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यात येत असल्याचे प्रतिष्ठानचे आधारस्तंभ शिवश्री रामभाऊ पवार यांनी म्हटले. यावेळी परंडा पोलिस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक श्री. गिड्डे  यांचा सन्मान करून त्यांना दिनदर्शिका देण्यात भेट आली. याप्रसंगी छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठानचे आधारस्तंभ शिवश्री रामभाऊ पवार, संस्थापक अध्यक्ष धनंजय वळेकर, प्रतिष्ठानचे कायदेशीर सल्लागार अॅड. अनंत राशिनकर, समाज परिवर्तन महासंघाचे अध्यक्ष अजय पवार, अमोल शेळके, नानासाहेब देवकर, महेश ठोंगे, श्रीराम गोडगे आणि प्रतिष्ठानचे पदाधिकारी व मावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply