June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

छत्रपती उदयनराजेंच्या या पूरश्नामुळे सरकारे निरुत्तर

सातारा – आपल्या धडाकेबाज वक्तव्यांसाठी आणि निर्भिड विधानांसाठी प्रसिद्ध असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते, छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज व राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले यांनी एकबिनतोड सवाल करुन केंद्रासह राज्य सरकारांना निरुत्तर केल्याचे चित्र आहे.
कोरोनाविषाणूमुळे फैलावत असलेल्या कोव्हिड्‌19 च्या पार्श्‍वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने एका अध्यादेशाद्वारे लोकप्रतिनिधींचे, म्हणजेच खासदार, आमदारांचे दोन वर्षांचे निधी तुमच्याकडे गोठवून घेतले. त्या निधीचं केंद्र व राज्य सरकारने काय केले? ते पैसे गेले कोठे? गोर गरिबांना सुख-सुविधा मिळत नसताना हा निधी नक्की कोठे गेला, याचं उत्तर केंद्र आणि राज्य शासनाने दिलंच पाहिजे, असा थेट सवाल उदयनराजे यांनी विचारला आहे.

मराठेशाहीची राजधानी मानल्या जात असलेल्या सातारा शहरातही विजयादशमीच्या पारंपरिक उत्सवप्रियतेला फाटा देत जलमंदिरातही साधेपणाने दसरा साजरा करण्यात आला. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही मागणी केली आहे. सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. उपचारांसाठीही त्याच्याकडे पैसा नाही. अनेकांचे उत्पन्नाचे मार्गही बंद झाले आहेत. असे असताना लोकप्रतिनिधींच्या गोठवलेल्या निधीचा नक्की विनियोग कसा होणार आहे, याबाबर सरकारने उत्तर देणे गरजेचे आहे, असे उदयनराजे म्हणाले.

Leave a Reply