October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

चोरीमधील एक वर्षापासुन जप्त असलेले सोने पांगरी पोलीसांच्या प्रयत्नाने अखेर फिर्यादीस सुपुर्त

सोलापूर; महाराष्ट्र स्पीड न्युज

चोरीमधील एक वर्षापासुन जप्त असलेले सोने पांगरी पोलीसांच्या प्रयत्नाने अखेर फिर्यादीस सुपुर्त करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की चिखर्डे येथे दि.०३/०५/२०१९ रोजी रात्री नानासाहेब लिंबराज चौधरी यांचे बंद घराचा कोणीतरी अज्ञात चोरटयांनी
कड़ी कोयंडा कुलुप तोडुन घरामध्ये प्रवेश करून घरातील सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम असा
मुद्देमाल लंपास केला होता.त्याबाबत पांगरी पोलीस गुन्हा दाखल होताच पांगरी पोलीसांनी तपासाची
सुत्रे हलवुन गुन्हयात तिन आरोपीना अटक करून त्यांचेकडुन नानासाहेब चौधरी यांचे घरातील चोरीस
गोलेल्या सोन्याच्या दागीन्यापैकी ४० गॅम वजनाच्या २ सोन्याचा पाटल्या व १५ ग्रॅम वजनाच्या ३
अंगठया असा एकुण २,४७,००० रू किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
त्यानंतर फिर्यादीने सदर चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळणे करीता बार्शी न्यायालयात वारंवार अर्ज करून
देखील काही तंत्रीक अडचणीमुळे त्यांना मिळु शकला नव्हता त्यामुळे तो मुद्देमाल मागील एक
वर्षापासुन पोलीस ठाणेस जप्त होता.
त्यानंतर मा उप विभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांचे सुचणेप्रमाणे फिर्यादीस पांगरी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सुधीर  तोरडमल
यांनी संपर्क करूज व त्यांना समक्ष बोलावुन त्यांना मुद्देमाल मिळणेबाबत बार्शी न्यायालयात अर्ज दाखल
करणेस सांगितले.त्याप्रमाणे अर्जदार यांनी अर्ज दाखल केल्यानंतर प्रभारी
अधिकारी तोरडमल  यांनी न्यायालयात व सरकारी अभीयोक्ता यांचेशी चर्चा करून अर्जदार यांना मुद्देमाल ताब्यात देणेबाबतचा आदेश होणेस विनंती केली.त्याप्रमाणे आदेश प्राप्त झाल्याने
पोलीस रेझींग डे वे औचित्य साधुन अर्जदार नानासाहेब चौधरी रा चिखर्डे ता बार्शी यांचे ताब्यात ४० ग्रॅम
वजनाच्या २ सोन्याचा पाटल्या व १५ ग्रॅम वजनाच्या ३ अंगठया असा एकुण २,४७,000 रू चा
मुद्देमाल देण्यात आला.

Leave a Reply