चिखर्डे ता बार्शी शिवारात अपघात, शेतक-याचा मृत्यू

बार्शी;-महाराष्ट्र स्पीड न्युज
भरधाव वेगातील अज्ञात वाहनाच्या धडकेत एका शेतक-याचा जागेवरच मृत्यू झाल्याचा प्रकार बार्शी- उस्मानाबाद रस्त्यावर चिखर्डे (ता.बार्शी) येथे शासकीय रूग्णालयाच्या शेजारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला.
#बब्रुवान खंडू वीर वय-६५ रा. चिखर्डे असे अपघातात मृत्यू मुखी पडलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे.
# याबाबत तानाजी बब्रुवान वीर यांनी पांगरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की वडील बब्रुवान वीर हे रात्रपाळीची लाईट असल्यामुळे ते रात्री आठ वाजता शेतात ज्वारी भिजवायला गेले होते परंतु लाईट न आल्यामुळे ते शेतातून साडे नऊ वाजता घराकडे येण्यासाठी निघाले होते परंतु रात्री साडे दहा वाजता फिर्यादीचा भाचा निलेश सुभाष कोंढारे व सूरज भैरू कोंढारे हे बार्शी उस्मानाबाद रस्त्यावरील चिखर्डे नजीकच्या हॉटेल राजगडहुन चिखर्डेत येताना त्यांना अज्ञात वाहनाच्या धडकेत मयत झाल्याचे आढळून आले. याबाबत अज्ञात वाहना विरुद्ध पांगरी पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास पांगरी पोलीस करीत आहेत.