June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

चिखर्डेच्या सरपंचपदी आ.राजेंद्र राऊत गटाचे पाटील, उपसरपंच अरूण पदी चौधरी


बार्शी ;
चिखर्डे ता.बार्शी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी आ.राजेंद्र राऊत गटाचे प्रकाश  पाटील तर  उपसरपंचपदीही याच गटाचे अरुण  चौधरी यांची निवड झाली.
सरपंचपदासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले.सरपंच पदासाठी प्रकाश पाटील यांना दहा मते पडली तर संभाजी कोंढारे यांना एका मतावर समाधान मानावे लागले.

Advertisement

निवडीप्रसंगी नवनिर्वाचित सदस्य कु प्राजक्ता रामलिंग कोंढारे , संभाजी  कोंढारे,फुलबाई अपुणे,हीना  शेख,सुभाष  देवकर, ,माधुरी सचिन पाचकवडे , जयराम आडगळे,जनाबाई वसंत यादव,शोभा मोहन मसेकर उपस्थित होते.

आ.राजेंद्र राऊत गटाने सर्व अकरा जागा जिंकत ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे.यावेळी आमीत कोंढारे, विजय कोंढारे, आयूब शेख, बाळासाहेब कोंढारे, प्रदीप पाचकवडे,संदेश देवकर,नाना कोंढारे,दिगंबर मसेकर आदी उपस्थित होते.निवडीनंतर गावात गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. माने  यांनी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डि. के.कांबळे यांनी काम पाहिले.

Leave a Reply