June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

चारे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनिता जगदाळे तर उपसरपंच पदी शर्मिला जाधव बिनविरोध


बार्शी;
बार्शी तालुक्यात लक्षवेधी ठरलेल्या चारे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बार्शी पंचायत समितीचे गटनेते सुंदरराव जगदाळे यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास आघाडीच्या सुनिता वसंत जगदाळे तर उपसरपंच पदी त्याच गटाच्या शर्मिला हनुमंत जाधव यांची बिनविरोध निवड पार पडली.सरपंच व उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. बुवा व ग्रामसेवक पद्मराज जाधवर यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली.

Advertisement

यावेळी नुतन ग्रामपंचायत पदाधिकारी जयराम जगदाळे, सुनिता  जगदाळे, जयश्री  गोरे,  सतीश  लोंढे,प्रशांत जगदाळे , शर्मिला  जाधव , पूजा  काळे उपस्थित होते.
  निवडीनंतर नुतन ग्रामपंचायत पदाधिका-यांचा पंचायत समिती गटनेते सुंदरराव जगदाळे यांच्या हस्ते यथोचीत सत्कार करण्यात आला.
  जनतेने मोठ्या विश्वासाने सत्ता आपल्याकडे दिली असुन जनतेच्या अपेक्षापूर्ती साठी नुतन पदाधिका-यांनी प्रयत्न करावेत.आवश्यक ती सर्व मदत केली जाईल असे प्रतिपादन पंचायत समिती गटनेते सुंदरराव जगदाळे यांनी निवडीनंतर बोलताना केले. जगदाळे गटाने 9 पैकी 7 जागा जिंकत वर्चस्व प्रस्थापित केले होते.

Leave a Reply