June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

चक्क  कुत्री बनली मांजराच्या पिलांची माता….

सोलापूर;महाराष्ट्र स्पीड न्युज

तस पाहिले तर कुत्री व  मांजर यांचं हाडवैर सर्वश्रुत आहे .बहुधा  ती नित्याचीच बाब बनलेली आहे.मानवाच्या  वस्तीत घरातील हे पाळीव प्राणी असले तरीही दोघेही एकमेकांना सतत  पाण्यात पाहत असतात.मात्र त्या पद्धतीला  एक  अपवाद येथे घडला असून चक्क  कुत्रीच मांजराच्या पिलांना दूध पाजत आहे,
भंडारकवठे ता.दक्षिण सोलापुर गावातील लिंगायतपाटील गल्लीत वावरत असलेली कुत्री दररोज न चुकता मांजराच्या पिलांना दूध पाजवत आहे,त्यांचे हे अनोखे मातृत्व पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली  आहे.

Advertisement

याबाबत अधिक माहिती अशी की  लिंगायत पाटील गल्लीत नेहमीच  फिरत असलेल्या कुत्रीने दोन आठवड्यातपूर्वी चार पिलांना जन्म दिला होता.त्यातील दोन पिल्ले कोणीतरी घेऊन  गेली आणि  दोन पिल्ले मरण पावली,आसपास पिल्ले दिसत नाहीत हे पाहून कुत्री व्याकुळ झाली अन् सैरभैर होऊन इकडेतिकडे भटकू लागली,
यादरम्यान दोन मांजराची पिल्ले आपल्या आईला शोधत सदर कुत्रीजवळ आले,आणि
चार पिलांच्या दुःखाने व्यतीत  झालेल्या कुत्री मातेचे वात्सल्य प्रेम जागे झाले अन् ती चक्क  मांजराच्या दोन पिलांना दूध पाजवू लागली आईच्या  प्रेमाने  त्या  पिलांना कुरवाळू लागली.पाटील गल्लीतील एखाद्या व्यक्तीने त्या  मांजराच्या पिलांना मारले तर ही कुत्री मारणार्याच्या अंगावर धाऊन चावण्यासाठी जाते.जोरजोरात मोठा आवाज करू लागते.
हा मातृप्रेमाची अजब, अनोखा आणि आविष्कार  पाहण्यासाठी गावातील  नागरिक  पाटील गल्लीत  गर्दी दैनंदिन गर्दी  करत आहेत.आजच्या काळात मानव नाती-गोती विसरत चालला आहे.सख्खे भाऊ पक्के वैरी होत ठरू पहात  आहेत मात्र या मतलबी जगासमोर अनोखे अशा पद्धतीने  मातृप्रेम जपणारी कुत्री व मांजराच्या पिलांच्या जोडीने मानवाला  एक आदर्श घेण्यास सांगत आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार  नाही.

#महाराष्ट्रस्पीडन्युज

Leave a Reply