November 29, 2022

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

ग्रामीण भागातील शिव रस्त्यासाठी जास्तीत जास्त मदत करू ; आ.राजेंद्र राऊत

बार्शी ;
रस्त्यांसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करूण देऊन शेत रस्ते गुणवत्तेचे करण्यासाठी नक्कीच मदत केली जाईल. त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही असे प्रतिपादन आ.राजेंद्र राऊत यांनी केले.ते आज शुक्रवारी लोकसहभागातून होणा-या  गुळपोळी-सुर्डी- रस्तापुर या साडेचार किलो मीटर लांबीच्या रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

Advertisement

#यावेळी व्यासपीठावर तहसीलदार सुनील शेरखाने,सभापती अनिल डिसले,नायब तहसीलदार संजीवन मुंढे,गटविकास अधिकारी शेखर सावंत, पंचायत समिती सदस्य इंद्रजित चिकने,कौरव माने,बाजार समिती संचालक बापु शेळके,जि.प.बांधकाम विभागाचे आयुब शेख,मंडल अधिकारी शरद शिंदे,ग्रामविकास अधिकारी वैभव माळकर,विनायक डोईफोडे,बाबा काटे,मालवंडीचे उपसरपंच विष्णु चव्हाण आदी उपस्थित होते.

आ.राऊत पुढे बोलताना म्हणाले की शिवरस्त्यासाठी व रोजगार हमीसाठी खुप निधी शिल्लक आहे. या रस्त्याला चांगला निधी दिला जाईल.दळणवळणाची साधने उपलब्ध झाल्यास त्या भागाला अर्थकारण उपलब्ध होते.आपन आपली सोय करत असताना सरकार आपल्या पाठीशी आहे.
सांगाल त्या कामासाठी मी कटिबद्ध आहे असेही ते म्हणाले.

तहसीलदार सुनिल शेरखाने यांनी तालुक्यातील रस्त्याचे प्रश्न कमी करण्यावर आपला भर राहणार असल्याचे सांगितले.

प्रास्ताविकात इंद्रजित चिकने यांनी  या रस्त्यासाठी लोकसहभाग कशा पद्धतीने उपलब्ध केला याची माहिती दिली.

@कार्यक्रम यश्यस्वी करण्यासाठी  पंचायत समिती इंदजित चिकणे,महादेव चिकणे,माजी सरपंच दत्ता काळे,गौतम चिकने,गोविंद चिकने,गणेश चिकने,अक्षय सावंत,विशाल भोसले,किशोर भोसले, किशोर चिकणे नागेश शिंदे भैरवनाथ बारवकर, शहाजी चिकणे, महेश चिकणे ओंदुबर सावंत स्वप्नील चिकणे आदींनी परिश्रम घेतले.विनायक घोडके यांनी सुत्रसंचालन केले.

Leave a Reply