October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

गौडगाव सरपंचपदी स्वाती पैकेकर तर सरपंचपदी तर उमा शिंदे

बार्शी ;

बार्शी तालुक्यातील  गौडगाव ग्रामपंचायतच्या इतिहासात प्रथमच महिलांकडे सरपंच व उपसरपंच पद आले असून           आ. राजेंद्र राऊत गटाच्या स्वाती बालाजी पैकेकर यांची सरपंचपदी तर उमा हिराचंद शिंदे यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली. सरपंच पदाकरिता स्वाती बालाजी पैकेकर व वैशाली भारत पैकेकर यांचे तर उपसरपंच पदाकरिता उमा हिराचंद शिंदे व सुरेश विश्वनाथ काकडे यांचे अर्ज दाखल झाले होते.      निवडणूक प्रक्रियेमध्ये सरपंच पदाच्या उमेदवाराला स्वाती पैकेकर यांनी ७ व वैशाली पैेकेकर यांना ४ मते मिळाली. उपसरपंचपदाच्या उमेदवार उमा शिंदे यांना ६  व सुरेश काकडे यांना ५ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सी.बी. गावडे,गावकामगार तलाठी ज्ञानेश्वर वाघमारे व ग्रामसेवक ए.बी. कराड यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली. सदस्य नागनाथ लक्ष्मण काजळे, साधना संतोष भड, मैनाबाई चंद्रकांत आरगडे, सुशांत अशोक सुरवसे, सागर गजेंद्र भड, धनश्री रमाकांत गरड, प्रसाद दत्तात्रय सोनवणे, यांच्यासह राहुल भड, संजय भड, भैय्या मगर, विलास यादव, बालाजी भड, युवराज काजळे, यशवंत शिंदे, भास्कर काकडे आदी उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply