गोरमाळे सरपंचपदी राजेंद्र पाटील तर उपसरपंच पदी उमेश खळदकर बिनविरोध

बार्शी ;
गोरमाळे ता.बार्शी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राजेंद्र पाटील तर उपसरपंच पदी उमेश खळदकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सरपंच व उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल करण्यात आल्यामुळे सरपंच उपसरपंचाची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिका-यांनी जाहीर केले.
यावेळी नुतन ग्रामपंचायत सदस्य रवींद्र शिंदे,लक्ष्मण बनसुडे,इंदुमती ढेंबरे,छबूबाई भुसारे,जयश्री मोरे,इंदुबाई मोरे,जनाबाई क्षीरसागर उपस्थित होते.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून
कराड एन एम यांनी काम पाहिले.
निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
Advertisement