June 9, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

गॅस सिलिंडर व कनेक्शन बुकिंगमध्ये होणार बदल,पहा काय बदल होणार

पाटणा : वृत्तसंस्था – येत्या काही दिवसांत एलपीजी कनेक्शन स्थानिक रहिवाशी दाखला नसतानाही मिळेल. यामुळे नवीन कनेक्शन घेणार्‍या लोकांना मोठा दिलासा मिळेल. तेल कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकार एलपीजी कनेक्शन कमीत कमी कागदपत्रांसह आणि स्थानिक रहिवाशी दाखल्याशिवाय कनेक्शन देण्याच्या योजनेची तयारी करत आहे.

दुसर्‍या शहरांमध्ये कामानिमित्त जाणार्‍या लोकांसाठी एलपीजी सिलिंडर घेणे अवघड होते. याबाबत एलपीजी सिलिंडरचे नियम बदलत आहेत. नव्या नियमानुसार ग्राहक आता कोणत्याही एका डीलरऐवजी एकावेळी तीन डीलरकडून गॅस बुक करू शकतील.

नेहमी ग्राहक गॅसची बुकिंग करतात आणि त्यांना वेळेवर सिलिंडर मिळत नाही.

यासाठी ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार आता गॅस सिलिंडरबाबत नियम बदलत आहे. आता नव्या नियमानुसार ग्राहक आता कोणत्याही डीलरच्या ऐवजी एकावेळी तीन डीलरकडून गॅस बुक करू शकतील.

Leave a Reply