October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

गुळपोळी सरपंचपदी सौ.शुभांगी नरखडे तर उपसरपंचपदी निरंजन चिकणे बिनविरोध

बार्शी ;
बार्शी तालुक्यातील गुळपोळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.शुभांगी अमोल नरखडे आणि उपसरपंचपदी निरंजन शांतिनाथ चिकणे यांची बिनविरोध निवड पार पडली.
         अध्यासी अधिकारी म्हणून बार्शी पंचायत समितीचे महिला बालविकास अधिकारी शैलेश सदाफुले यानी काम पाहिले तर ग्रामसेवक वैभव माळकर , तलाठी रावसाहेब देशमुख, पोलीस पाटील बाळकृष्ण पिसे उपस्थित होते.
        यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्य कृष्णा चिकणे , शिरीष चिकणे, कैलास माळी, कृषणा चौधरी, कांता चिकणे, सुनीता काळे, सविता मचाले उपस्थित होते..
       हा कार्यक्रम यशस्वी करणेसाठी श्रीकांत  मचाले, रामहरी काळे, दत्तात्रय काळे, परमेश्वर मचाले, अमोल नरखडे, आण्णासाहेब चिकने, कल्याण चिकने यानी परिश्रम घेतले.निवडीनंतर गावात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

Advertisement

Leave a Reply