June 9, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

गुड फ्रायडे व ईस्टर संन्डे हे सण शासन नियमानुसार साजरे करावे – राकेश नवगिरे

बार्शी ;

या पवित्र आठवड्यात गुड फ्राइडे व इस्टर संन्डे हे सण येत आहेत. हे सण ख्रिस्ती समाजात पवित्र मानले जातात परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हे सण साधेपणाने साजरे करावे असे आवाहन राकेश नवगिरे यांनी केले. भारतात परिस्थिति भयानक होत आहे. या अदृश्य अशा शत्रु विरुद्ध केंद्र व राज्य सरकार वैधकीय यंत्रणा, पोलीस बांधव, आरोग्य व सफाई विभाग आपली प्राणाची बाजी लावून स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्यासाठी अहोरात्र परिश्रम करत आहेत. व राज्य सरकारच्या आदेशाचे पालन करणे हे आपणा सर्वाचे कर्तव्य आहे. “इस्टर संडे” म्हणजेच “पुनरुत्थान दिन” प्रभु येशू ख्रिस्त इस्टर दिनी मरणावर विजय मिळवूनी पुनरुस्थित झाले आहेत. दरवर्षी बार्शीतील महिला पुनरुत्थान रॅली काढ़तात पण यावर्षी वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी महिलानी “सामाजिक अंतर” ठेवून आपल्या घराच्या दारात उभा राहून “प्रभु उठला आहे, होय खरोखर उठला आहे” घोषणा द्याव्या व संपूर्ण जगातील कोरोना संकट दूर व्हावे यासाठी प्रार्थना करावी, दि.२८/३/२०२१ ते ४/४/२०२१ “होली वीक” म्हणून साजरा करतात या “होली वीक” मध्ये सरकार ने दिलेल्या नियमावली प्रमाणे चर्च मध्ये ५० लोकांच्या उपस्थिती मध्ये सामाजिक अंतर ठेवून व आवश्यकतेनुसार ४ ते ५ खास प्रार्थना सभेचे आयोजन करावे, प्रार्थना सभेच्या वेळी सर्वांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, चर्चने प्रार्थना सभेचे ऑनलाइन प्रक्षेपण करावे व्हाट्सएप, फेसबुक व युट्युब या सोशल मीडिया माध्यमाचा वापर करावा, चर्चच्या बाहेर गर्दी करू नये, माझ्या ख्रिस्ती बांधवाना आवाहन आहे की आपण गुड फ्राइडे व इस्टर संन्डे हे पवित्र सण सरकारी नियम पाळून साजरे करावे. तसेच मुस्लिम, हिंदू व शिख बांधवाना ही मी आवाहन करतो की त्यानीही आपले सण सरकारी नियमावली पाळून साजरे करावे, हे जाती धर्माचे नसून संपूर्ण देश, जग व मानवजाति वर आलेले संकट आहे, याचा मुकाबला आपण मानव म्हणून करूया, मानवाचा हा शत्रु वेगळा आहे आपण विनाकरण रस्त्यावर न जाता घरी बसून या शत्रुला हरवुया व पोलिस यंत्रनेला व जे ह्या विरुद्ध लड़त आहेत त्यांना मदत करूया.

Leave a Reply