गाव कारभा-यांचा पुढाकार,लोकसहभाग यामुळे पुरी बनले पाणीदार गाव

बार्शी;-महाराष्ट्र स्पीड न्युज
गावच्या कारभा-यांनी मनावर घेतल्यास गावाचा व परिसराचा चेहरा मोहरा बदलण्यास वेळ लागत नसल्याचे व गाव पाणीदार होण्यास वेळ लागत नसल्याचा प्रत्यय पुरी ता.बार्शी येथील ग्रामस्थांना आला आहे.
नदी, ओढा सरळीकरण, खोलिकरण, सिमेंट बंधारे आदी लाखो रूपयांचा निधी खेचुन आणून गाव व परिसरात पाणीसाठा वाढवण्यात पुरीचे युवा सरपंच अमर पवार हे यश्यस्वी झाले आहेत.
पुणे-लातुर राष्ट्रीय महामार्गावर पांगरी पासुन जवळ असलेल्या पुरी गावात नदी खोलीकरण व सरळीकरणावर 25 लाख रुपये,सिमेंट बंधा-यासाठी 22 लाख रुपये आदी निधी खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे बंधारे,नद्या व ओढे सध्याही भरूण वाहत असल्याचे दृष्य दिसुन येते.
बंधारे व नदी पाहता कोकणातील नदी अथवा तलावावर तर आपण नाही ना असा विचार मनात निर्माण होतो.
गावची लोकसंख्या दिड ते दोन हजार. त्यातही बरीच मंडळी कामानिमित्त पुणे, मुंबई, बाहेरगावी असतात. गावची आणखी वेगळेपण म्हणजे पुरी गाव हे जेसीबी ऑपरेटर चे गाव म्हणून ओळखले जाते.गावात असे एकही घर दिसणार नाही जिथे जेसीबी, ट्रॅक्टर, ऑपरेटर नाही.
यापूर्वी नदी होती मात्र ती अतिशय अरूंद होती. त्यामध्येही अनेक झाडे, महानंदी, झुडपे वाढलेली होती. पावसाळ्यात महिनाभर पाणी राहिले तरी काही कालावधीने ते आटूण जायचे.
कुठल्या कामासाठी निधी कुठून आणायचा आणि तो कसा मंजूर करून घ्यायचा हे सरपंचानी चांगलेच समजून घेतले. निधी नसेल तर स्वखर्चाने त्यानी गावातील कामे केली. पाणीप्रश्न असेल गावातील रस्ते असतील, गावातील अंतर्गत गटारी असतील, रस्त्यावरील पथदिवे असतील, अशी अनेक कामे ग्रामपंचायत च्या विकास निधी मधून मार्गी लागली आहेत.
चौकट;-अमर पवार(सरपंच, पुरी);-शासनाच्या योजना गावात राबवुन गावाचा विकास साधण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहु.