गाताचीवाडीत चोरट्याकडुण दोन महिलांना मारहाण, चाकु हल्ला करून मंगळसुत्र लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न

बार्शी ;
शेतातील कामकाज उरकुन घराकडे निघालेल्या दोन महिलांपैकी एकीला चाकूने तर दुसरीला लाकडाने मारहाण करून गळ्यातील सोन्याचे मंगऴसुञ लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचा प्रकार बार्शी-कुर्डुवाडी बाह्यवळण रस्त्यावरील गाताचीवाडी ता.बार्शी चौकातील कानिफनाथ मंदिराजवळ रात्री 8.45 वाजण्याच्या सुमारास घडला. अनोळखी तिन चोरटय़ांविरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
#सौ.वर्षा भाऊसाहेब गरदडे वय 32 ,रा.गाताचीवाडी,ता.बार्शी व रेश्मा गणेश लोंढे वय 28 वर्षे,रा.बागलवस्ती, कुर्डूवाडी अशी जखमी महिलांची नावे आहेत.
@सौ.वर्षा भाऊसाहेब गरदडे वय 32 ,रा.गाताचीवाडी यांनी फिर्याद दिली आहे.फिर्यादीत म्हटले आहे की
शेतामध्ये ज्वारीचे पिक असुन ज्वारी काढण्याचे काम चालु आहे.ज्वारी काढण्यासाठी मदतीकरीता धाकटी बहीण रेश्मा गणेश लोंढे वय 28 वर्षे,रा.बागलवस्ती कुर्डूवाडी ही काल दि.22/02/2021 रोजी गाताचीवाडी येथे गावी आलेली होती. बहीण रेश्मा तसेच गावाततील मजुरीने लावलेल्या बाया असे मिळुन दिवसभर सायंकाळी 07.00 वा.चे पर्यंत ज्वारी काढली.त्यानंतर फिर्यादी,त्यांची बहीण रेश्मा असे त्यांच्या हॉटेलवर आले व तेथेच स्वयंपाक करुन सायंकाळी 08.00 वाजता जेवन करुन दोघी मिळुन घराकडे पायी जात होत्या.
गाताचीवाडी चौकातील हॉटेलसमोर तिन अनोळखी इसम मोटार सायकलवर उभे होते. दोघी पुढे चालत कानिफनाथ मंदिराच्या समोर उताराला आल्या असता बायपासरोड वरुन हॉटेल समोर उभे असलेल्या तिन इसमांपैकी एकजण त्यांच्या पाठीमागे चालत येवु लागला. तेंव्हा दोघींनी त्यास पुढे जाण्यासाठी बाजुला होवुन वाट दिली.परंतु तो इसम पुढे जात नव्हता म्हणुन फिर्यादी मोबाईलच्या बॅटरीच्या उजेडात त्यास पाहत असतना चोरट्याने त्याच्या जवळील लाकडी दांडक्याने उजव्या हातावर जोराने मारले तसेच पाठीवर व पायावर मारहाण केली.
दोघी घाबरुन मोठ मोठ्याने ओरडत असताना बहीण रेश्मा ही खाली पडली.तेंव्हा त्या अनोळखी चोरट्याने बहीण रेश्मा हिचे गळ्याला चाकु लावुन तिचे गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र चाकुने तोडुन घेतले व त्या चोरट्याच्या हातात निम्मेच मंगळसुत्र हातात आल्यानंतर त्याने माझ्या बहीणीच्या उजव्या डोळ्याच्या खाली चाकुने मारहाण केली.
तो चोरटा बायपास रोडकडे चढावर गेला व तेथे मोटार सायकलवर दोन अनोळखी चोरटे उभे होते.त्या मोटर सायकलवर तो चोरटा बसुन बायपासरोडने बी.आय.टी.कॉलेजच्या दिशेने निघुन गेले.
जखमीस उपचारासाठी हिरेमठ हस्पिटल बार्शी येथे दाखल केले आहे.बार्शी तालुका पोलीस ठाण्यात अनोळखी चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.