October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

गाडीच्या डिगीतुन दारू विकणा-यास घेतले बार्शी पोलिसांनी ताब्यात.

सोलापूर;

बार्शी बंद दिवशी आपल्या दुचाकीच्या डीगी तून दारू विकणारा एक इसम बार्शी पोलिसांनी पकडला असून त्याचे नाव सचिन अरुण नवगण असे आहे.  बंद दिवशी बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांनी बार्शी बस स्थानकाच्या पुर्वेकडील गेट जवळ दारू विकत असताना रंगेहात  पोलिसांनी पकडले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,
विटंबना प्रकरण व आमदार राऊत यांना धमकी प्रकरणामुळे बार्शीतील विविध संघटनांनी स्वयंस्फूर्तीने उस्फुर्त बंद पाळला होता. बार्शी शहर व  तालुका पूर्णपणे बंद असताना बंदोबस्तासाठी नेमणुकीला असलेले पोलीस कॉन्स्टेबल अजय वाघमारे,  स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण व त्यांच्या बरोबर असणारे पोलीस कर्मचारी सिद्ध पाटील,  गुळवे कारडकर,  राठोड व गायकवाड हे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना माहिती समजली की बार्शी बस स्थानकाच्या पूर्वेकडील गेट  जवळ एक व्यक्ती आपल्या दुचाकीचा डीगी तून देशी विदेशी दारू विकत आहे. तेव्हा पंचांसमक्ष फिर्यादी अजय वाघमारे व त्यांच्या साथीदारांनी त्या ठिकाणी गेले असता बार्शीतील भवानी पेठ येथील सचिन नवगण हा व्यक्ती आपल्या दुचाकीच्या डिगीतून देशी-विदेशी दारू विकत असलेला  त्यांना आढळला ,  त्यास ताब्यात घेतले असून त्याच्या जवळ दुचाकी च्या किमती सहित 55, 708 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.  ही घटना सकाळी अकरा वाजता घडली  असून सचिन नवगण हा आपल्या ज्युपिटर च्या डिगी तुन टॅंगो , ऑफिसर चॉईस , इम्पेरियल ब्लू अशा प्रकारच्या दारूच्या बाटल्या विकताना सापडल्या आहेत. यावेळी पोलिसांनी त्याच्या जवळ असणारी दुचाकी जुपिटर व देशी-विदेशी दारू ताब्यात  घेतली असून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1960 प्रमाणे 65 ई  प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. बार्शीत अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले असून आता सचिन नवगण याने ही दारू कोठून घेतली होती  याचा तपास ही आता बार्शी पोलिसांनी करावा ही मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.

Advertisement

Leave a Reply