February 3, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

गर्भवती पत्नीचा खुन, पतीला जन्मठेप

सोलापूर;महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

प्रेमिकेसमवेत विवाह  करण्यासाठी गर्भवती पत्नीचा डोक्यात धारदार चाकूने सपासप  मारुन खून करुन जबरी चोरीचा बनाव करणार्‍या महेश भारत मिसाळ (रा. पुणे) यास सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी जुळल्यामुळे गुन्ह्याची उकल झाली. मयत मनिषा हिचा घटनेपूर्वी सात महिने अगोदरच महेशशी विवाह झाला होता. खूनाच्यावेळी ती चार महिन्यांची गरोदर होती.

उस्मानाबाद तालुक्यातील कोंबडवाडी येथील मनिषा दादाराव फुगारे हिचा विवाह 7 मे 2017 रोजी गावाशेजारील खामसवाडी येथील महेश भारत मिसाळ याच्याबरोबर झाला होता. महेश हा पुण्यात कामास होता. त्यामुळे लग्नानंतर दोघेही पुण्यास रहावयास गेले. लग्नानंतर काही दिवसांनी तिला आपला पती सतत एका महिलेशी फोनवर बोलत असल्याचे लक्षात आले. त्याबाबत तिने आपल्या माहेरी कल्पना दिली होती.

2 जानेवारी 2018 रोजी अचानक सकाळी 10.30 वाजता महेश पत्नीसह सासुरवाडीला आला मात्र न थांबता तो लगेच पत्नीला घेवून आपल्या बार्शी तालुक्यातील पाथरी येथील बहिणीकडे गेला. त्यानंतर संध्याकाळी त्यांचा फिर्यादी फुगारे यांना येतो म्हणून फोन आल्यानंतर काही काळाने त्यांना दोघांचेही फोन लागत नसल्याचे आढळून आले.त्यामुळे ते आपल्या नातेवाईकांसह त्यांना शोधण्यासाठी निघाल्यानंतर रात्री येरमाळ्याजवळ महेशने चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत मनिषाचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

मात्र पांगरी पोलिस ठाण्याचे तत्कालीन स.पो.नि. धनंजय ढोणे,हवालदार  मनोज भोसले,शैलैश चौघुले,सतीश कोठावळे, अमोल माने,मनोज जाधव, प्रसाद औटी,सागर चौबे,संदीप कवडे,रफिक बिराजदार,बोधमवाढ,अर्जुन कापसे यांनी त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने भावाच्या मेहुणीबरोबर प्रेमसंबध असून तिच्याशी लग्न करण्यासाठी मनिषाचा खून केल्याची कबुली दिली होती.
त्यास त्याने केलेल्या या कृत्या करीता जन्मठेपेची शिक्षा दिली आहे.

Leave a Reply