खरीप पिक विमा रक्कम त्वरीत जमा करा; शंकरराव गायकवाड

बार्शी;
सन २०१८-१९चा दुष्काळ, पिकविमा व अतीवृष्टीचे रखडलेले अनुदान आदी मागण्यांसाठी गेल्या अठवड्यापासून आपण सभा घेऊन दि.५जानेवारीचे आंदोलन मोठे करण्याची तयारी सुरू करताच सरकार खडबडून जागे झाले असून लागलीच अतीवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खातेवर जमा केले असले तरी पिकविमा व मागील दुष्काळ निधी मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी खांडवी ता.बार्शी येथे झालेल्या जाहीर सभेतून सांगितले.आंदोलनाच्या भीतीने विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खातेवर खरिप विम्याची भरपाई बेकायदेशीर व अत्यल्प दिली असल्यामुळे तसेच अजूनही अनेक शेतकरी पिकविम्यापासून वंचीत असल्यामुळे, सरसकट सर्वच शेतकऱ्यांना शंभर टक्के विमा भरपाईसह, सन २०१८-१९ चा थकलेला दुष्काळचा निधी मिळविण्यासाठी ५ फेब्रुवारीच्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहनही शंकर गायकवाड यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सागर बारंगुळे तर आभार नितीन गव्हाणे यांनी मानले. यावेळी गौरव गरजे, भाऊसाहेब यादव, गोरख माळी, संदिप गव्हाणे, नानासाहेब कुदळे, अमोल शेळके, चांगदेव गव्हाणे, शंकर गव्हाणे, श्रीमंत गव्हाणे, बंडू धुमाळ, सुधीर बारंगुळे, आनंद पाटील, सर्जेराव भाकरे, प्रकाश भाकरे, नागनाथ उबाळे, विठ्ठल शेळके, मधुकर चौधरी, विलास कदम आदींसह पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.