June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

खराब नोटा बदलण्यासाठी आरबिआयच्या नवीन गाईडलाईन जारी

नवी दिल्ली,  : जर तुमच्याकडे फाटलेल्या नोटा असतील आणि त्या दुकानदारही घेत नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही. आता अगदी सहजपणे या फाटलेल्या नोटा बदलता येणार आहेत. RBI (Reserve Bank Of India) कडून फाटलेल्या-जुन्या नोटांबाबत गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, ग्राहक बँकेत जाऊन नोटा बदलून घेऊ शकतात.

Advertisement

बँकेत बदलता येणार फाटलेल्या नोटा –

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, प्रत्येक बँकेला जुन्या, फाटलेल्या नोटा ग्राहकांकडून स्वीकाराव्या लागतील. यात केवळ एकच अट आहे, या नोटा नकली नसाव्यात. फाटलेल्या नोटा बँक ब्राँचमध्ये जाऊन बदलण्यासाठी कोणताही चार्ज किंवा शुल्क आकारलं जाणार नाही.त्याशिवाय, नोटा बदलण्यासाठी त्या बँकेचे ग्राहक असणंही आवश्यक नाही.

नोटेची स्थिती –

नोट बदलून द्यायची की नाही, हे बँकेकडून ठरवलं जातं. त्यासाठी ग्राहक बँकेला जबरदस्ती करू शकत नाही. बँकेत नोट दिल्यानंतर, बँक नोट मुद्दाम, जाणून-बुजून फाडलेली नाही ना? हे चेक करते. त्याशिवाय नोटची कंडिशन कशी आहे, हेदेखील बँक तपासते. त्यानंतरच नोट बदलून दिली जाते. फाटलेल्या नोटा बँकेत बदलण्याऐवजी खात्यात जमाही केल्या जाऊ शकतात.

कोणत्या नोटा बदलल्या जात नाही –

काही स्थितीत नोट बदलून दिली जात नाही. भारतीय रिझर्व्ह बँकच्या नियमांनुसार, अतिशय खराबप्रकारे जळलेल्या, तुकडे-तुकडे झालेल्या स्थितीतील नोटा बदलल्या जात नाहीत. अशाप्रकारच्या नोटा आरबीआयच्या इश्यू ऑफिसमध्येच जमा केल्या जाऊ शकतात.

या नोटांचा वापर करू नका –

ज्या नोटांवर कोणताही संदेश लिहिलेला असेल किंवा राजकिय संदेश असल्यास, त्या नोटांचा वापर केला जाऊ शकत नाही.

Leave a Reply