March 23, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

खडसेंना राष्ट्रवादीत मिळणार मोठी जबाबदारी?

जळगाव ः राष्ट्रवादीत भाजपाचे नाराज एकनाथराव खडसे हे घटस्थापनेच्या दिवशी जाणार असल्याचे जवळ जवळ निश्‍चीत मानले जात आहे. त्यांना राष्ट्रवादीत आमदार पदा सोबत महत्वाचे स्थान देखील मिळण्याची शक्यता असल्याचा दावा नंदुरबारचे माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी एका वाहिनीला मुलाखत देतांना केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत खडसे येत असल्याने उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या गटात कमालीची उत्सुक्ता आता दिसू लागली आहे.

मुलाखती दरम्यान श्री. पाडवी म्हणाले, कि मी नाथाभाऊंची काही महिन्यापूर्वी भेट झाली असता मला त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार मी भाजप सोडून ९ सप्टेंबरला राष्ट्रवादीत सल्यानुसार गेले होते.

काही दिवसापूर्वी मुंबई येथे शरद पवारांनी खडसेंच्या प्रवेशाची चाचपणी बाबत बैठकी घेतली होती. त्यानंतर खडसे-पवार यांची भेट बाबत चर्चा होती. त्यानुसार खडसे मुंबई वरून परत आल्यावर मी त्यांना भेटलो. साहेब तुम्ही मुंबईवरून आलात तर काही आनंदाची बातमी आणली का असा प्रश्‍न मी विचारला. तेव्हा खडसेंनी चेहऱ्यावर स्मिथ हास्य देत सर्व पॉझिटिव्ह चर्चा झाली आहे. सर्व ऊहापोह झालेला असून येत्या आठ दिवसात आपण प्रवेश करणार असल्याचे सांगितले.

मानाचे स्थान देखील मिळणार
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांपैकी चार आमदार राष्ट्रवादीचे असून त्यात खडसेंचे नाव यादीत असेल. त्यांच्या उंची प्रमाणेच त्यांना मानाचे पद पक्षामध्ये व मंत्रिमंडळात देण्याची शक्यता आहे. त्यांचे पुनर्वसन झाल्यावर उत्तर महाराष्ट्राला व जिल्ह्याला चांगले दिवस येतील असे दावा पाडवी यांनी केला.

Leave a Reply