क्रांती बहुद्देशीय संस्थेच्या वतीने आधारकार्ड शिबिर संपन्न…

बार्शी ;
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 190 व्या जयंतीनिमित्त, क्रांती बहुउद्देशीय संस्था बेलगाव व डाक विभाग बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय नियमांचे पालन करत, बेलगाव येथे आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी उपस्थिततांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धीरज शेळके, सचिव आगतराव शेळके, डाक विभागाचे उपविभागीय अधिकारी अमित देशमुख, प्रणाली प्रबंधक माधव बारस्कर, डाक साहाय्यक रघुनाथ डावलबाजे, डाक आवेक्षक अजित नडगिरे, रवींद्र बगाडे, पोस्टमास्तर दिनकर माळी, गणेश पवार, मेजर राहुल पाटील, महाराष्ट्र पोलीस लक्ष्मण शेळके, आदर्श शिक्षक गोकुळदास शेळके, शशिकांत शेळके, आदी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्ड मध्ये दुरुस्ती करणे तसेच पोस्ट विभागाच्या वतीने जनतेसाठी राबविण्यात येत असलेल्या शासकीय विविध योजनांची माहिती देणे आदि उपक्रम राबविण्यात आले. पोस्ट विभागाच्या विविध योजनांची माहिती देत आपले गाव सुकन्या ग्राम व डिजिटल इंडिया ग्राम बनवण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन डाक विभागाचे उपविभागीय अधिकारी अमित देशमुख यांनी केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधत बेलगाव येथील सुपुत्र मेजर राहुल पाटील यांनी देश सेवेसाठी भारतीय सेनेमध्ये 17 वर्षे पूर्ण केल्याबद्दल क्रांती बहुद्देशीय संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.