March 23, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

कोविड योद्ध्यांचं बार्शीकरांवर ऋण, सोपल यांच्याहस्ते अन्नछत्रालयांचा सन्मान

बार्शी;
कोरोना काळातील लॉकडाऊन परिस्थितीचं गांभीर्य ओळखून बार्शीत अनेक ठिकाणी अन्नछत्रालय सुरू झाली. सोलापूरच्या अधिकाऱ्यांनीही बार्शीतील अन्नछत्रालयांचं कौतुक केलं. पोलीस, आरोग्यसेवेतील कर्मचारी आणि पत्रकारांनीही कौतुकास्पद काम केलंय. लॉकडाऊनमध्ये या कोविड योद्ध्यांनी दाखवलेल्या दातृत्वाचं आणि कर्तृत्वाचं बार्शीकरांवर ऋण आहे, आभार हा शब्द तोकडाय, म्हणून ऋण असे मी म्हणतो, असे म्हणत माजी मंत्री दिलीप सोपल यांनी कोविड योद्ध्यांच्या कामाचे कौतुक केले. आझाद गणेश मंडळ आयोजित कोविड योद्धा सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.

Advertisement

आझाद गणेश मंडळ आयोजत कोविड योद्धा सन्मान सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री दिलीप सोपल, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, न.पा.विरोधी पक्ष नेते नागेश अक्कलकोटे,पोलिस उपनिरीक्षक शामराव गव्हाणे, नगरसेवक पृथ्वीराज राजपूत, नगरसेवक पिंटू माळगे, नगरसेवक प्रशांत माने उपस्थित होते.
   याप्रसंगी, पुढे बोलताना सोपल म्हणाले की, कोरोनापेक्षा कोरोनाच्या भीतीनं अनेक माणसं मृत्युमुखी पडली, या काळात परिस्थिचीचं गांभीर्य ओळखून शहरातील विविध अन्नछत्रालयांनी केलेल्या कामाची इतिहासात नोंद घेतली जाईल.

शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकरांनी कोरोना काळातील कटू-गोड आठवणींना उजाळा दिला. लॉकडाऊन काळातीली भीषण वास्तव त्यांनी आपल्या अनुभवातून कथन केलं. अन्नदानासह इतरही कामं आम्ही केली, पण लोकांच्या मनातील कोरोनाची भीती घालविण्याचं काम आम्ही केलं, असे भाऊसाहेब यांनी म्हटले.
  विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनीही मनोगत व्यक्त केले.
  कार्यक्रमासाठी लखन राजपूत, कुणाल नरके, रुपशे सदावर्ते, रामचंद्र ढोले, सागर शिराळ, राम गलांडे, ओंकार घोंगडे, संतोष खोगरे यांसह मंडळातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.  

#कोविड महायोद्धा सन्मान- भाऊसाहेब आंधळकर यांना ‘कोविड महायोद्धा’ म्हणून गौरविण्यात आलं.

#कोविड योद्धा सन्मान
श्री अंबरीष वरद भगवंत अन्न छत्रालय
राजमाता इंदुताई आंधळकर अन्नछत्राल
नाकोडा जैन सेवा मंडळ
कर्तव्य जनसेवा फाऊंडेशन
मातृभूमी प्रतिष्ठान
वर्धमान जैन श्रावक संघ
आण्णासाहेब पेठकर मित्र मंडळ
ओन्ली समाजसेवा ग्रुप
स्व. शोभाताई सोपल आणि स्व. शांतीलालज तातेड यांच्या स्मरणार्थ अन्नछत्रालय
महेश यादव आणि गणेश नान्नजकर मित्र मंडळ अन्नछत्र
बार्शी शहर पोलीस ठाणे
सनराईज फाऊंडेशन

#विशेष सन्मान
सुनिल फल्ले – शातीदूत सेवारत्न पुरस्कार
मयूर गलांडे – पत्रकारिता पुरस्कार
सिद्धेश्वर बरीदे – एमपीएससी उत्तीर्ण
धन्यकुमार पटवा – गोरक्षक

Leave a Reply