October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

कोविड फ्री इंडिया’ राष्ट्रीय खुली ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचे आयोजन

सोलापुर;-महाराष्ट्र स्पीड न्युज
कॉन्फेडरेशन ऑफ युनेस्को क्लब्ज अँड असोसिएशन ऑफ
इंडिया (सीयुसीएआय) नवी दिल्ली यांचेतर्फे सर्व भारतीयांसाठी ‘कोविडमुक्त भारत’ या विषयावर
खुली ऑनलाईन ‘कोविड फ्री इंडिया
या राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेसाठी युनेस्को स्कूल क्लब महाराष्ट्र सहकार्य करीत असल्याची माहिती स्पर्धा प्रसिद्धी व संपर्क प्रमुख प्रतापसिंह मोहिते यांनी दिली आहे. कोविडमुक्त भारत या विषयावर देशभरातील सर्व नागरिकांसाठी ही स्पर्धा खुली असणार आहे.
दि.५ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर २०२० या कालावधीत ही स्पर्धा ऑनलाईन
पद्धतीने घेण्यात येणार आहे. यात
अव्वल १० विजेते निवडण्यात
येऊन त्यांना पारितोषिक देण्यात
येणार आहे. तर स्पर्धकांना सहभागी झाल्यानंतर त्वरित सहभाग प्रमाणपत्रही प्राप्त होणार आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्यास ३५०० रुपये,प्रमाणपत्र तसेच ट्रॉफी
देण्यात येणार आहे तर द्वितीय
व तृतीय येणाऱ्या विजेत्यांना अनुक्रमे २५०० रुपये, १५०० रुपये, प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात येणार आहे. तसेच
४ ते १० क्रमांक पटकावणाऱ्याना देखील उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून
५०० रुपये व प्रमाणपत्र देण्यात येणार
आहे. तसेच स्पर्धेतील सर्वोत्तम
१५० चित्रांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्र
देण्यात येईल.त्याच प्रमाणे ज्या संस्था, शाळा, शिक्षक यांच्या मार्फत २० पेक्षा अधिक स्पर्धक, विद्यार्थी सहभागी होतील अशांना विशेष राष्ट्रीय गौरवपत्रही देण्यात येणार आहे.

Advertisement

स्पर्धेचा निकाल २६ जानेवारी २०२१ रोजी घोषित केला जाईल. या स्पर्धेत प्रक्रिया शुल्क १० रुपये असून स्पर्धेत
सहभागी होण्यासाठी तसेच स्पर्धेची नियमावली जाणून घेण्यासाठी
http://unescoclubsmh.
in या लिंकचा वापर करावा तसेच अधिक माहितीसाठी 8421504851 या व्हाट्सअप्प नंबरवर मॅसेज करावा अशी माहिती देण्यात आली. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन राज्यप्रमुख विजय पावबाके,स्पर्धा प्रसिद्धी प्रमुख प्रतापसिंह मोहिते यांनी केले आहे.

Leave a Reply