March 23, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

कोरोनामुळे पांगरीतील शेतकऱ्यांचे ते आंदोलन ढकलले पुढे

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज
पिकविमा, अतिवृष्टी व मागील दुष्काळ निधी राहिलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ द्या, ग्रामीण भागातील नादुरुस्त असलेले सर्व रस्ते नव्याने डांबरीकरण करा, उजनी कॕनॉलचे पाणी पुर्वीच्या सर्व्हे नुसार ओपन पध्दतीने पाथरी, ममदापूर, गोरमाळे तलावात सोडा,विज वितरण कंपनीने विद्युत कनेक्शन तोडणे बंद करावे आदी विविध मागण्यांसाठी बार्शी ते लातूर रस्त्यावरील पांगरी येथे आज ठरल्याप्रमाणे आयोजित करण्यात आलेले रस्ता रोको आंदोलन करण्यासाठी लोक जमा झाले परंतु पांगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुधिर तोरडमल, पांगरीचे मंडल अधिकारी विशाल नलवडे, जि.प.बांधकाम विभागाचे जुबेर शेख आदींनी कोरोनाच्या संदर्भात वरिष्ठांनी दिलेले आदेश दाखवून आंदोलन पुढे ढकलण्याची विनंती केली.
  त्या विनंतीला मान देत शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड व शिष्ठमंडळासोबत पांगरी पोलीस ठाण्यात विविध आलेल्या संबंधित अधिकाऱ्यांची सकारात्मक चर्चा घडवून आणण्यात आली. यावेळी शंकर गायकवाड यांनी मागण्यांची पुर्तता लवकरच न झाल्यास पुन्हा ८ मार्च रोजी ठरल्याप्रमाणे रस्ता रोको किंवा संबंधित अधिकाऱ्यांना कोंडून फटके मारण्याचे आंदोलन करणार असल्याचे यावेळी गायकवाड यांनी सांगितले, त्यावेळी शेतकरी संघटनेचे बार्शी तालुका युवा अध्यक्ष शरद भालेकर, सचिन आगलावे, रामराव काटे, स्वप्निल पवार, बाळकृष्ण काकडे, पांगरीचे माजी सरपंच औदुंबर काकडे आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

व्हिडीओ-

Leave a Reply