कोरोणा-महत्वाची बातमी वाचा…

मुंबई | देशासह राज्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. मुंबई व पुणे ही महत्त्वाची आणि जास्त लोकसंख्या असलेली ही शहरे देखील कोरोनाच्या विळख्यात अडकली होती. मात्र मुंबई व पुणेकरांनी ‘करून दाखवलं’ असे आता म्हणावे लागेल. याचे कारण असे की, या शहरांमध्ये कमी रुग्णवाढ दिसून येत आहे.
कोरोना विषाणूचे देशातले हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबई आणि पुण्यात रुग्णांचा आलेख पहिल्यांदाच घसरणीला लागला असून आता पुन्हा लाट येऊ नये म्हणून जास्त सावध राहण्याची सूचना डॉक्टरांनी केली आहे. गेल्या ५ महिन्यातली सगळ्यात कमी रुग्णवाढीची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मुंबईत दिवसभरात ८०० नव्या रुग्णांची भर पडली.
तर ३७ जणांचा मृत्यू झाला. सोमवारी मुंबईमध्ये निच्चांकी वाढ नोंदवली गेली आहे.
याचप्रमाणे पुण्यात देखील कोरोना रुग्णांच्या संख्येचा आकडा आता ओसरू लागला आहे. सोमवारी पुण्यात दिवसभरात गेल्या पाच महिन्यातील निच्चांकी कोरोना रूग्णवाढ नोंदविण्यात आली. दिवसभरात अवघे १४७ रूग्ण आढळून आले आहेत. यामुळे आता मुंबई व पुणे या शहरांसाठी ही गुड न्यूज मानली जातं आहे.
दरम्यान, सोमवारी दिवसभरात १४७ नव्या रुग्णांची भर पडली तर बरे झाल्यामुळे ४१० जणांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच पुण्यात ३२ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात १३ रूग्ण पुण्याबाहेरचे असल्याची माहिती मिळत आहे.