December 3, 2022

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

कोरोणाचे संकट भयावह,झोकुन देत काम करा; पवार

मुंबई :
कोरोणाच्या महामारीने गंभीर रूप घेतले असून, या महामारीच्या संकटावर मात करण्यासाठी राज्यातील जनतेने सहकार्य करावे व शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. या अभूतपूर्व संकटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी स्थानिक स्तरावर झोकून देऊन काम करावे असे आवाहनही राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांना पत्राद्वारे केले आहे.

कोरोनाची दुसरी लाट संपूर्ण राज्यात पसरलेली आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ होत असून, परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. राज्य शासन, पोलीस व प्रशासकीय यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. , राज्यातील आरोग्य यंत्रणेचे डॉक्टर्स, परिचारिका व संलग्न कर्मचारी रुग्णांना दिलासा देण्यासाठी अहोरात्र झटत आहेत, असेही पवार यांनी म्हटले आहे.
या संकटावर मात करण्यासाठी जनतेच्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता असुन राज्य शासनाने वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे जनतेने तंतोतंत पालन करून गर्दी टाळणे, अंतर राखणे, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे, स्वच्छता राखणे वगैरे सूचना कसोशीने पाळाव्यात. सभा-समारंभ अथवा कोणतेही गर्दीचे कार्यक्रम शक्यतो टाळावेत, असेही पवार यांनी सांगितले.

Leave a Reply