March 24, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

कोरेगाव येथे बालकाला बेदम मारहाण

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज

तु आमच्या गल्लीत का आलास असे म्हणुन एका अल्पवयीन मुलाचा हात मोडेपर्यंत मारहाण करत घाण घाण शिवीगाळी करूण तु जर परत गल्लीत दिसला तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील कोरेगाव येथे घडला.

#उमेश चोरमले वय 47 रा.कोरेगाव असे अल्पवयीन मुलाला मारहाण करूण जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे .

ओमराजे  वय 15 रा.कोरेगाव असे मारहाणीत जखमी झालेल्या बालकाचे नाव आहे.
बार्शी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्याचा मित्र रोहन रामगुडे याच्या भावाच्या लग्नाला त्याचे गल्लीत सायकल वरुन गेलो होतो.लग्न लावुन मी घरा कडे निघालो होतो.  रामगुडे याच्या घरा समोर आलो
असता,आमच्या गावातील उमेश चोरमले हा रसत्यात समोर होता त्याला पाहून मी माझी सायकल स्टॅण्डला
लावली त्यावेळी तो फिर्यादीला म्हणाला की तु तर वाण्याचा आहे तु आमच्या गल्लीत का फिरतो असे महणुन घाण शिवीगाळ सुरु करूण हाताने मारहाण करण्यास सुरवात केली.
त्यावेळी तो बालक खाली पडला.तरीही त्याने डावे हातावर लाथा घालण्यास सुरुवात केली.जखमी अवस्थेत हा मोठ मोठ्याने ओरडत मला कशामुळे मारता असे विचारत होतो.त्या मारहाणीत याचा हात मोडला बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास राजेंद्र मंगरूळे हे करत आहेत.

Leave a Reply