कोरेगाव येथे बांधावर सोडलेल्या विद्युत प्रवाहामुळे शेतक-याचा मृत्यु

बार्शी;महाराष्ट्र स्पीड न्युज
रानडुक्करापासुन पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेताच्या बांधावर सोडलेला विद्युत प्रवाह दिवसाही चालु ठेवल्यामुळे शेजारील शेतक-याचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यु झाल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील कोरेगाव शिवारात घडला.
#शंकर पंढरीनाथ पारवे वय 60 रा.कोरेगाव असे विजेच्या धक्क्याने मृत्यु मुखी पडलेल्या वृद्ध शेतक-याचे नाव आहे.
#देविदास गिराम व त्यांचा मुलगा आण्णा देविदास गिराम दोघे रा.कोरेगाव, ता.बार्शी अशी संगणमत करून शेताचे बांधावरील तारा मध्ये हयगयीने,
निष्काळजीपणाने इलेक्ट्रीक करंट सोडुण तो दिवसादेखील बंद न केल्यामुळे तारांचा शॉक लागुन एकाच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.
#मनोज पारवे वय 37 वर्षे रा. उपळाई रोड, चव्हाण प्लॉट बार्शी यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.फिर्यादीत म्हटले आहे की त्यांची शेती गट नंबर 6
शेजारी देविदास गिराम याचे शेत असुन देविदास गिराम व त्यांचा मुलगा आण्णा देविदास गिराम यांनी शेताचे बांधावर डुकरांपासुन
सरक्षण करणे करीता तारा टाकुन रात्रीचे वेळी त्यामध्ये इलेक्ट्रीक करंट सोडत होते,
दुपारी 1.00 वाचे सुमारास ते बार्शीतील दुकानी असताना पुतण्या प्रथमेश याने फोन करून सांगितले की तो व आजोबा शंकर अंसे दुपारी 12.45 वाचे सुमारास शेतामध्ये ज्वारीचे पिकाला पाणी देत
होतो. त्यावेळी पाणी देत देत शेताच्या बांधावर गेलो त्यावेळी अचानक बांधावरील तारांचा आजोबा शंकर यांना शॉक
लागला त्यामुळे आजोबा मोठ मोठयाने ओरडु लागले व मला लाकडाने मार असे म्हणु लागले मी आजु बाजुचे लोकांना बोलावुन
आणले तेंव्हा शेताजवळील निशिकांत चोरमले व बाळासाहेब पारवे हे पळत आले त्यांनी लाईटचे कनेक्शन सोडवले व आजोबांना
पाहिले असता ते बेशुध्द पडले होते असे सांगितले. जखमी अवस्थेत त्यांना बार्शीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिका-यांनी मयत घोषित केले.बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास हवालदार राजेंद्र मंगरूळे हे करत आहेत.