कोरेगाव येथे आकांक्षा चोरमले हिचा सत्कार

सोलापूर;महाराष्ट्र स्पीड न्युज
बार्शी तालुक्यातील कोरेगाव येथे नीट परीक्षा मध्ये 720 गुणा पैकी 607 गुण मिळून उल्लेखनीय यश संपादन करूण कुमारी आकांक्षा अनिल चोरमले हीला एमबीबीएस या पदासाठी मेडिकल कॉलेज मुंबई येथे प्रवेश मिळाल्याबद्दल कोरेगाव मध्ये संत बाळूमामा प्रतिष्ठान मार्फत नागरी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक अभियंता अशोक काळे, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. दयानंद शिंदे,अॅड. नितीन शिंदे,परंडा पंचायत समितीचे माजी सभापती लिंबराज शिंदे, विलास सलगर तसेच आकांशा चे वडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल खेलबा चोरमले, गावातील संदीप काळे, विलास हाके, राजाभाऊ चोरमले, महादेव काळे, सुनील चोरमले, प्रकाश चोरमल, आदित्य महानवर, सतीश चोरमले,तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी विकास मोठे यांनी केले आभार समाधान हाके यांनी मानले.
गावातील सर्व थरातून तिचे तोंड भरून कौतुक करण्यात आले. यशामागे तिचे वडील, आई व शिक्षकांचे मार्गदर्शन मोठे लाभले आहे त्यामुळेच हे यश संपादन केले आहे असं सत्कार कार्यक्रमामध्ये आकांक्षा चोरमले ने मनोगत व्यक्त केले